महाराष्ट्र

Prakash Ambedkar : निवडणुकीनंतर ठाकरेंचा ‘हा’ उमेदवार भाजपसोबत जाईल!

Probability : शक्यता नाकारता येत नाही

 

Vanchit Aghadi : मुंबई उत्तर पश्चिममध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर उध्दव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण, निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गोरेगाव येथील सभेत केला. वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांच्या प्रचारसभेत बोलत ते होते.

निवडणुकीतील तमाशा 

आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे. शिवसेना (ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली. असे प्रचार सभेत सांगितले जाते. पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील.

खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी आहे ? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या असे त्यांनी सांगितले.

Gram panchayat : सरपंचपद आरक्षणासाठी उजाडणार डिसेंबर 2025

कमी मतदानाचा फटका भाजपला

2014 आणि 2019 मध्ये भाजप 70 ते 72 टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता 50 आणि 60 टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ते 400 पार नव्हे 250 पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सभेला मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार परमेश्वर रणशूर, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, ऋषिकेश नांगरे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!