महाराष्ट्र

Tumsar APMC : सभापती, उपासभापतीची खुर्ची कोण बळकावणार

Tussle On : तुमसर- मोहाडी बाजार समितीत रस्सिखेच सुरू

Bhandara district : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आता सर्वांच्या नजरा सभापती व उपसभापतीपदाकडे लागल्या आहेत.पंधरा दिवसात सहकार विभाग निवडणुकीचे नोटिफिकेशन काढणार असल्याची माहिती आहे.18 संचालक पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने बळीराजा जनहित पॅनल स्थापन केले होते. या पॅनलचे 10 संचालक निवडून आले.त्यामुळे महत्त्वाची पदे कोणाला मिळतात याची गोळाबेरीज सुरू आहे. 

निवडणुकीत आमदार राजू कारेमोरे यांच्या पॅनलचे चार व चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलचे तीन संचालक निवडून आले. एका अपक्ष संचालकाने बाजी मारली.

दरम्यान,बळीराजा जनहित पॅनलकडून सभापतिपदी भाऊराव तुमसरे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. येथे उपसभापतिपदाकरिता मात्र रस्सीखेच सुरू आहे. चुरस निर्माण होण्याचे चित्र आहे.

Sudhir Mungantiwar : ती विचारांचं तेल संपलेली मशाल आहे !

अडीच वर्षांनंतर तुमसर, मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. यासाठी राजकीय पक्ष बाजूला सारून येथे निवडून येण्याकरिता आघाडी तयार करण्यात आली होती. त्यात भाजपप्रणीत बळीराजा जनहित पॅनेलला यशही मिळाले.या पॅनेलचे प्रमुख असलेले स्थानिक भाजप नेते भाऊराव तुमसरे यांनी आघाडीची स्थापना केली होती.राकाँ शरद पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करून सहकाराच्या सत्तेत एंट्री घेतली. आता राकाँचा अजित पवार गट अस्वस्थ झाला आहे. येथे खरी रस्सीखेच उपसभापतिपदाच्या निवडणुकीत दिसणार आहे.

उपसभापती पदासाठी इच्छुक

बळीराजा जनहित पॅनेलचे रामदयाल पारधी, डॉ. हरेंद्र रहांगडाले, जय किसान महाविकास पॅनेलचे कलाम शेख, शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे राजू माटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. बळीराजा जनहित पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्याच पॅनेलचा उमेदवार उपसभापती होण्याची शक्यता अधिक आहे.असे असले तरी सहकारात ऐन वेळेवर कोणत्याही पॅनेलमधील नाव समोर आल्यास आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!