Political war : निवडणूक काळात मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलविन्ना शिवीगाळ करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते साजीद खान पठाण यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल झाला. आता बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी संतप्त झाली आहे. या प्रकरणी खामगावातील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काल रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर अकोल्यात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ही ऑडिओ क्लीप काँग्रेस नेते साजीद खान यांची असल्याचा आरोप झाला. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, यासाठी वंचितकडून आंदोलनही करण्यात आले. गुरुवारी रात्री खामगावात वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जमून साजिद खान पठाण यांच्या विरोधात तक्रार दिली.
ऑडिओ क्लिप व्हायरल
अकोला येथील काँग्रेसचे साजीद खान पठाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ऑडिओ क्लिप मध्ये मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांनी प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे अपील का केले ? या कारणावरून मौलवी तसेच वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द बोलून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला. खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते घोषणा दे होते. साजीद खान पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित ने खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
प्रकरण चौकशीवर !
या प्रकरणात बुधवारी रात्री अकोल्यात पठाण यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याच प्रकरणी खामगावात ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर सदर तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे.