Pm Naredra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणशी मधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते त्यांच्यासोबत होते. मोदींनी अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक असलेला जिरेटोप परिधान केला.
त्यावर महाराष्ट्रात सर्वस्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.राजकीय वर्तुळामध्ये संतापाची लाट उसळलली. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पटेल यांच्यावर मविआच्या नेत्यांनी टीका शकेली होती. प्रफुल्ल पटेल यांनी यावर भूमिका स्पष्ट केली.
प्रफुल्ल पटेल स्पष्टीकरण देताना म्हणाले
“हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ”
विरोधी पक्षाकडून टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांनी प्रफुल्ल पटेल यांचे दाऊद आणि इकबाल मिर्चीसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच प्रफुल्ल पटेलांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदीच्या डोक्यावर चढवला.
आम्ही कुणाला देखील जिरेटोप देत नाही. प्रफुल्ल पटेल यांना हा अधिकार कुणी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्विट करत प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला. अशी टीका केली.