Political war : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा उबाठामध्ये काम करण्यास तयार झाला होता. मात्र, त्याच्याकडे मुंबईतील होर्डिंगची जबाबदारी देण्यात आली. त्याला मुंबई महापालिकेतून होर्डिंग देण्यात आले आणि त्याबदल्यात उबाठाच्या नेत्यांचे वाढदिवस आणि निवडणूक प्रचारासाठी या बेकायदा होर्डिंगचा वापर झाला, असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला. भिंडे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो यावेळी मंत्री सामंत यांनी दाखवले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबतची महत्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, भावेश भिंडे याच्यामागे मोठी राजकीय शक्ती आहे. भिंडे हा प्यादा असून होर्डिंगचा खरा मालक आणि सूत्रधार शोधण्याची आवश्यकता आहे. भिंडेवर अनधिकृत होर्डिंग लावण्याचे, झाडे मारल्याचे 21 गुन्हे दाखल आहेत.
240 तक्रारींकडे दुर्लक्ष
घाटकोपर येथील होर्डिंगबाबत स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेला 240 तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल उदय सामंत यांनी केला. शिवसेना विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी देखील तक्रार केली होती. मात्र, मागील तीन साडेतीन वर्षात भिंडेने होर्डिंग काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेत उबाठाची 25 वर्ष सत्ता होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग या भिंडेला कोणी मोठे केले. त्याला कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्नही उदय सामंत यांनी उपस्थित केला. भिंडेला राजाश्रय होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू
होर्डिंग दुर्घटनेत 14 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्याबाबत संवेदना आहे. मात्र उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण उबाठावर शेकू नये, म्हणून राऊत यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप मंत्री सामंत यांनी केला.
National Highway : महामार्गाच्या ‘समृद्धी’साठी 46 जण मैदानात
ज्यांच्या प्रचाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे लागतात आणि बॉम्बस्फोटातील आरोपी फिरतात. याबाबत उबाठाने जनतेला उत्तर द्यायला हवे. काल उबाठा उमेदवारांच्या रॅलीमध्ये हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोखाली काँग्रेसचा हात ही निशाणी होती. उबाठाने बाळासाहेबांचे विचार सोडले असून त्यांना विलीन करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. उबाठा राहुल गांधींच्या विचाराने चालत आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.