Ghatkoper Accident : घाटकोपर येथील दुर्घटनेला राज्य शासन आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 लोक ठार तर 80 लोक जखमी झाले. या दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन घटनेला जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.
रमेश चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटलला भेट दिली. घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रितिनिधी नाहीत. कारण सरकारने निवडणूकच घेतलेली नाही. सर्व कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी चालवत आहेत. घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना गंभीर असून या घटनेची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.
Jalgaon Politics : एकनाथ खडसे आणि महाजनांचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’!
हे नेते होते सोबत
रमेश चेन्नीथला यांच्याबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एस. संदीप, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.