महाराष्ट्र

Fake Post : मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी पोस्ट वरुन वादळ

Controversy : पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईची भाजपची मागणी

Jalgaon constituency : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. प्रचार अंतिम टप्प्यात असताना कुणीतरी खोडसाळपणा करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका चॅनलचे नाव वापरुन पोस्ट व्हायरल केली गेली. सदर पोस्ट खोटी असल्याचे उमेदवार स्मिता वाघ यांनी म्हटले. संबंधित आरोपींविरुध्द भाजपाकडून रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान या प्रकाराचा मंत्री गिरीश महाजन, स्मिता वाघ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सोमवारी या मतदारसंघात मतदान होत आहे. खोडसाळपणा मुळे चांगलाच वाद रंगला.

समाजात तेढ नको

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट तयार करून ती जळगाव मतदारसंघातील भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या नावाने व्हायरल करण्यात आली. या प्रकरणी स्मिता वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. एका महिलेला बदनाम करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण करू नका व समाजात तेढ निर्माण करु नका, असे आवाहन केले. याप्रकरणी त्यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला असून मराठा समाजानेही या घाडेरड्या राजकारणाचा शब्दात निषेध केला आहे.

Tough Contest : ‘ताईं’ची हॅट्ट्रिक ‘भाऊ’ रोखणार ? 

जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांचे पारडे जड मानले जात आहे. अशातच प्रचाराच्या तोफा थंडावल्या नंतर ‘खासदार झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणार’ अशी पोस्ट करून त्यावर स्मिता वाघ यांचा फोटो वापरण्यात आला. हा खोडसाळपणा समोर आल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री गिरीश महाजन, स्मिता वाघ, भाजपासह संपूर्ण मराठा समाजातर्फ या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. स्मिता वाघ म्हणाल्या, मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मनोज जरांगे यांनाही ही बातमी कळाल्यास ते देखील अशा वृत्तीचा विरोधच करतील. मात्र, माझ्या विरोधात षडयंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोतच, असे स्मिता वाघ यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले गिरीश महाजन?

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे. यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र त्यांना सुज्ञ मतदार त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!