Congress News : पुण्याच्या सहकारनगर परिसरात भाजपकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस चौकीमध्ये ठिय्या मांडला. संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिस चौकी बाहेर 12 मे च्या रात्री 10 राडा झाला.
चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. पुणे मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर,वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके रिंगणात आहेत.
ठिय्या आंदोलन
पुण्यात मतदानाला काही तास शिल्लक होते. मात्र, त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. याची तक्रार करूनही पोलिस कारवाई करीत नसल्याचा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पोलिस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले. सहकारनगर पोलिस चौकीत त्यांनी ठिय्या मांडला. कारवाई करा अशी त्यांची मागणी होती.