महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस राजकारणात अपरिपक्व, कोण म्हणाले?

Sanjay Raut : त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका

Shivsena : देवेंद्र फडणवीस हे राजकारणात अपरिपक्व असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीचा आधार घेऊन राऊत बोलत होते. तसेच संजय राऊत यांच्या फडणवीसां वरील टीकेला शिंदे शिवेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. निवडणुकी दरम्यान वाकयुद्ध रंगलेले दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या मध्ये चढाओढ दिसून येते. फडणवीस यांना राऊत यांच्या विषयी विचारले तर, कोण राऊत अशा शब्दात हेटाळणी करतात. राऊत देखील टीका करण्याची संधी सोडत नाहीत.आता संजय राऊत यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.

राऊत पक्षाची इज्जत घालवत आहेत

संजय शिरसाट दररोज उठसुट वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची इज्जत गमावत आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष मजबूत करण्याचे काम करत आहेत.

आरोप प्रत्यारोप आणि निवडणूक

निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप होणारच परंतु ते व्यक्तिगत पातळीवर न राहता मुद्यांवर अपेक्षित असते. परंतु या निवडणुकीत व्यक्तिगत हल्ले मोठ्या प्रमाणात झालेले दिसले. काही अनाठायी वाद देखील उफाळून आले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने वादाचा परिघ रुंदावला होता. जुने मुद्दे उकरून काढून वाद निर्माण केले गेले. फडणवीस राऊत, नवनीत राणा ओवेसी बंधू, विजय वडेट्टीवार उज्ज्वल निकम यांच्यात वादविवाद झाले. अगदी एकमेकांना चॅलेंज करण्यात आले.

Manoj Jarange Patil : चंद्रकांत पाटील म्हणजे ‘तेरे नाम’ मधील सलमान खान

प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचले. नवनीत राणा यांच्या विरोधात तेलंगणा मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर वडेट्टीवार यांच्या विरुद्ध नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा 13 मे रोजी आहे. महाराष्ट्राचा विचार करता निवडणूक अंतिम टप्प्यात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!