महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : चंद्रकांत पाटील म्हणजे ‘तेरे नाम’ मधील सलमान खान

OBC Reservation : मनोज जरांगे पाटील यांचे विधान

OBC Reservation : लोकसभा निवडणुकी नंतर पुन्हा एकाद विराट सभा घेण्याचे आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्याचे सुतोवाच मनोज जरांगे पाटील केले आहे.मनोज जरांगे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जालना व बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वीच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का? असा सवाल त्यांनी उपस्थित ‘पाटील हे फक्त तेरे नाम स्टाईल भांग पाडून फिरत असतात, त्यांना काय कळतं’ असा थेट प्रहारच जरांगे पाटील यांनी केला आहे.भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना मनोज जरांगे पाटील यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यापैकी बीड मतदारसंघातही मतदान होणार आहे. मात्र, या मतदानापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे. 8 जून रोजी नारायण गड येथे भव्य सभा घेणार असून 15 मे रोजी त्या सभेनिमित्त सभास्थळाची पाहणी करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच, 15 तारखेच्या पाहणीनंतर सभेबाबतचा अंतिम निर्णय मी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जातीयवादी राजकारण..

पंकजा मुंडे यांना पाडा असं मी कुठेच बोललो नाही. उलट त्या जातीयवादी राजकारण करत आहेत. भरसभेत त्या म्हणतात आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. त्याचवेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणे गरजेचे होतं. मात्र, त्यांनी आक्षेप घेतला नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे”, असे जरांगे पाटील म्हणाले.

Navneet Rana : इम्तियाज यांनी केले ‘जलील’, म्हणाले तीला भुंकण्यासाठीच पाठवले

सरकार अन्याय का करत आहे?

मराठा समाजावर सरकार अन्याय का करत आहे? प्रमाणपत्र देण्याचा विषय होऊनही ती दिली का जा नाहीत. मराठा समाजावर पोलिसांकरवी हल्ला कोणी केला? आंदोलकांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय कोणी घेतला? या प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावीत. मराठा समाज भाजपच्या कधीच विरोधात नव्हता. तो जर विरोधात असता तर तुमचे (भाजप) 106 आमदार निवडूण आलेच नसते असेही जरांगे पाटील म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला, मी त्यांचे नाव लगेच घेणे बंद करतो. माझा एकच सवाल आहे, आमच्यावर गुन्हे कोणी दाखल केले? एसआयटी आमच्यावर का नेमली उत्तर द्या?, असे सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!