Bjp News : भाजपला राज्यात 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. हेच भाजपचं मिशन आहे. मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी झटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून प्रचार सभांना सुरुवात केली. चौथ्या टप्प्यापर्यंत त्यांनी सभांचे शतक पूर्ण केले आहे. देवेंद्र फडणवीस यांची शतकी खेळी भाजपला राज्यात 45 च्या जागा निवडून देईल का हे पाहणं औसुक्याचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 125 च्या वर सभा घ्यायचे आधीच जाहीर केलं आहे. पुणे येथील सभे नंतर त्यांचं राज्यात सभांचे शतक पूर्ण झालं. त्यामुळे राज्यात भाजपचे मिशन सक्सेस झाल्यास देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील भाजपमध्ये ‘किंग’ ठरतील.
राज्यातील वातावरण ढवळून निघाले
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पक्ष फुटीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्यात भाजपकडून मिशन 45 प्लस चा दावा करीत रणनीती आखली आहे. असे असताना राज्यातील भाजपचे स्टार प्रचारक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 100 सभा घेत प्रचारात आघाडी घेतली आहे.
चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी
चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवार, 13 मे रोजी आहे. प्रचाराच्या तोफाही थंडावल्या. दरम्यान पहिल्या टप्प्यापासून सुरू झालेल्या प्रचार सभांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या सभांना महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधून मोठी मागणी होती आणि आहे. पहिल्या टप्प्याची घोषणा होताच फडणवीसांनी दौरा घोषित केला. आता चौथा टप्पा पार पडत असताना फडणवीसांनी सभांची शतकी खेळी पूर्ण केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा अजून बाकी आहे. फडणवीसांकडून संपूर्ण फोकस लोकसभा निवडणुकीवर देण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांची राजकीय ताकद वाढल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. नरेंद्र मोदी, शाह आणि योगींप्रमाणे फडणवीसांची लोकप्रियता वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीसांची शतकी खेळी यशस्वी होईल?
फडणवीसांनी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना प्रचार सभांमध्ये मागे टाकले आहे. एकीकडे राज्यात भाजपला मागे टाकण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येत प्रचार करीत आहेत. तर फडणवीस यांनी प्रचारात आघाडी घेत सभांचे शतक पूर्ण केले आहे. राज्यात 45 वर जागा भाजपला मिळाव्या यासाठी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील सर्वच नेते कामाला लागले आहेत. मात्र या सर्व नेत्यांमध्ये फडणवीस यांचं नाव सध्यातरी आघाडी वर असल्याचं बोललं जातं आहे.
Political Battle : प्रचार थांबला; गावित, खैरे, विखे,दानवेंची परीक्षा
राज्यात फडणवीस त्यांचा सभांना मोठी मागणी आहे. फडणवीस यांच्या सभांना होणारी गर्दी, सभेतून विरोधकांवर केली जाणारी टीका टिपणी हा राज्यातील राजकारणाचा मोठा विषय बनतो. त्यामुळे लोकसभेत भाजपला राज्यात चांगलं यश मिळाल्यास या यशा मागे देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा असेल यात शंका नाही. मात्र नेमका निकाल काय लागेल हे 4 जूनलाच स्पष्ट होईल.