महाराष्ट्र

Eknath Khadse Come back : भाजप प्रवेशाला विरोध नाही, माझा मार्ग मोकळा

Return Home : गिरीश महाजनांसोबत एकत्र काम करू

Bjp politics : “भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितलंय, एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश निश्चित आहे. राज्यात काही लोकांची नाराजी होती. सर्वच गुणगान करतील असे नसते. नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय. भाजपात प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन आणि मला एकत्र काम करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाच्या हिताचे काही असेल तिथे दोघं मिळून निर्णय घेऊ. पक्षप्रवेशाबाबत कुणाचाही विरोध नाही, नाराजीचा सूर होता, तो मावळला असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. जळगाव भागात ते बोलत होते.

रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीत राहायचं

“मी भाजपात प्रवेश करायचे ठरवले तेव्हा रोहिणी खडसेंना सोबत येण्यास सांगितले. परंतु त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचे ठरवले. शरद पवारांसोबत आपली नाळ जोडलेली आहे. राष्ट्रवादीत भवितव्य आहे असं त्यांना वाटते. म्हणून त्यांनी माझ्यासोबत भाजपात येण्यास नकार दिला. रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या प्रचारात आहेत.” असे खडसे म्हणाले.

Vidarbha MLA In Pune : सुनील केदार पुण्यात छा गए…

रक्षा यांच्या प्रचारात

“महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय. मी मदत करत आहे. याठिकाणी पूर्वीसारखं वातावरण नाही. परंतु मोदी पंतप्रधान हवेत अशी नागरिकांची इच्छा आहे. नाराजी असली तरी मोदी पंतप्रधान हवेत असं लोकांना वाटते. केंद्र सरकारविरोधात नाराजी दिसत नाही. परंतु काही मुद्द्यांवर राज्य सरकारविरोधी नाराजी दिसते. कमी अधिक प्रमाणात अँन्टी इन्क्मबंसी दिसते. पण लोक भाजपाला पुन्हा निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत.”

यापुढे निवडणूक लढवणार नाही

“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. अजून पाच वर्षासाठी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले मी पद मागणार नाही. त्यामुळे मला राजीनामा देण्याची गरज नाही. मी राजकारणातून निवृत्ती घेतली नाही. मी राजकीय माणूस आहे.पण सध्या निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही.” असेही एकनाथ खडसे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!