महाराष्ट्र

National Highway : महामार्गाच्या ‘समृद्धी’साठी 46 जण मैदानात

Samruddhi Express Way : एमएसआरडीसीने मागवलेल्या निविदांना उत्तम प्रतिसाद

Mumbai : नागपूर समृध्दी महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पातील तीन महामार्गांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मागविलेल्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला. तीन प्रकल्पांसाठी एकूण 46 तांत्रिक निविदा सादर झाल्या आहेत. नागपूर-चंद्रपूरसाठी 22, भंडारा – गडचिरोलीसाठी 4, तर नागपूर – गोंदियासाठी 20 अशा 46 निविदा सादर झाल्या आहेत. येत्या दहा-बारा दिवसांत आर्थिक निविदा खुल्या करण्यात येतील. त्यानंतर निविदा अंतिम करून चालू वर्षातच तिन्ही महामार्गांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

टप्प्यानुसार कामाचे नियोजन

नागपूर-चंद्रपूर महामार्ग : टप्पा 1 – अॅफकॉन इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, माँटेकालो, टप्पा 2 – अॅफकॉन इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, माँटेकालो, टप्पा 3 – बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, टप्पा 4 – गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, टप्पा 5 – गवार कन्स्ट्रक्शन, पटेल इन्फ्रा, एचजी इन्फ्रा, टप्पा 6 – बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, गवार कन्स्ट्रक्शन, पटेल इन्फ्रा, एचजी इन्फ्रा.

या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी एमएसआरडीसीने 11 टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या. शुक्रवारी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या.

नागपूर – गोंदिया महामार्ग टप्पा 1 – अॅफकॉन इन्फ्रा, जी. आर. इन्फ्रा, माँटेकार्लो, एनसीसी, टप्पा 2 – अॅफकॉन इन्फ्रा, अॅपको इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, पीएनसी इन्फ्रा, टप्पा ३ अॅफकॉन इन्फ्रा, अॅपको इन्फ्रा, एनसीसी, ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंग, पीएनसी इन्फ्रा, टप्पा 4- अॅफकॉन इन्फ्रा, माँटेकार्लो, ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंग, एनसीसी, पटेल इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, माँटेकालों.

Police Protection : सुरक्षा दलांचा वेढा; एसपी पूर्णपणे ‘रेडी’

भंडारा-गडचिरोली महामार्ग : टप्पा 1 गवार कन्स्ट्रक्शन, जीआर इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट, पटेल इन्फ्रा.

194 किमीच्या नागपूर – चंद्रपूर महामार्गासाठी सहा टप्प्यांत 22 निविदा सादर झाल्या आहेत. तर 142 किमीच्या भंडारा गडचिरोली महामार्गासाठी एका टप्प्यात 4, तर 162 किमीच्या नागपूर – गोंदिया महामार्गासाठी चार टप्प्यांत 20 निविदा सादर झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विदर्भातील वाहतूक व्यवस्था मजबूत

विस्तारीकरणामुळे विदर्भातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल, असा दावा करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर चंद्रपूर, भंडारा गडचिरोली आणि नागपूर गोंदिया असा विस्तार भविष्याची नांदी ठरेल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!