महाराष्ट्र

Peaceful Election : जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे

Restrictions : खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निर्णय

Raver, Jalgaon Constituency : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी चार दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणी 4 जून असे चार दिवस जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

उमेदवाराचे आराखडे..

लोकसभा निवडणुकीची रंगत अंतिम टप्प्यात आहे. आपापला उमेदवार निवडणून आणण्याबाबत कार्यकर्त्यांकडून आराखाडे बांधले जात आहेत. आपलाच माणूस ‘भावी खासदार’ अशी स्वप्न कार्यकर्त्यांकडून रंगवली जात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत निकाल जाहीर झाल्यानंतरच कार्यकर्त्यांना त्यांचा खासदार कोण असेल याचा अंदाज बांधता येईल. दरम्यान, निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांसह मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांकडून मद्याचे आमिष दाखवले जाते.

निवडणूक काळात मद्य विक्री प्रमाण जास्त

त्यामुळे निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात मद्याची खरेदी-विक्री होते. तसेच काळ्या बाजारातील मद्याचीही उलाढाल या काळात सर्वाधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, मतदानाच्या वेळी व मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यात कोरडा दिवस जाहीर केला आहे.

Chandrapur Liquor : दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी

निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासापासून म्हणजेच 11 मे रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच 12 मे आणि 13 मे रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत याशिवाय मतमोजणी 4 जून रोजी असे एकूण चार दिवस मद्यविक्री बंद राहील. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!