Raver, Jalgaon constituency : मतदार यादीत नाव समाविष्ट करणे तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्तीसाठी फाॅर्म सहा आणि आठ भरून देणे. तसेच अर्ज स्वीकृतीनंतर मतदार ओळखपत्र पोस्ट ऑफिस मार्फत मोफत घरपोच वितरीत करण्यात येते.
जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया तीन दिवसांवर आली आहे. डाक विभागही निवडणूक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत जळगाव डाक विभागाने 2 लाख 26 हजार 67 निवडणूक मतदारांना घरपोच पाठवले आहे. ओळखपत्र वाटप पोस्ट विभागाकडून सुरू आहे.
निवडणूक विभागाकडून नवीन मतदारांची नोंदणी केल्यावर मतदान ओळखपत्र मतदारांना वितरणासाठी पोस्टात पाठवले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये नव्या मतदारांना तसेच अपडेट केलेले मतदान कार्ड थेट मतदारांच्याच हातात, डाक विभागाकडून देण्यात आले आहे.
प्रलोभनास बळी पडू नये – निवडणूक विभाग
इतर कोणत्याही प्रकारे मतदार ओळखपत्राचे (ईपीक) वाटप होत नसल्याने मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
पोस्टमनतर्फे ओळखपत्रांचे वाटप
गेल्या वर्षभरापासून मतदान कार्डचे वाटप डाक विभागाकडून केले जात आहे. यासाठी डाक विभागाकडून त्या-त्या विभागातील मतदारांच्या पत्त्यावर पोस्टमनच्या माध्यमातून या ओळखपत्रांचे वाटप केले जात आहे.तसेच मतदारांना मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जनजागृती देखील केली जात आहे.
Congress President : मल्लिकार्जुन खर्गे यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न
हे 12 पुरावेही धरले जातील ग्राह्य ?
निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक, पॅन कार्ड, जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगाचे रोजगार ओळखपत्र, निवृत्ती वेतनाचा दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, दिव्यांग व्यक्तींना दिलेले विशेष ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.