महाराष्ट्र

Arvind Kejriwal : जामीन मिळताच अकोल्यात ‘आप’चा जल्लोष

Delhi Scam : गेल्या 51 दिवसांपासून होते तुरुंगात

Aam Admi Party : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या 51 दिवसांपासून तुरुंगात होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात शुक्रवारी (ता. 10) जल्लोष केला. फटाके फोडत, एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष करण्यात आला. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती. अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना मोठा दिलासा दिला. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. या निर्णयाचे अकोला आम आदमी पार्टीने स्वागत करीत जल्लोष केला. सुप्रीम कोर्टात अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याची माहिती अकोल्यात पोहोचली. त्यानंतर जल्लोषाला सुरुवात झाली.

कार्यकर्ते आनंदित

अकोला आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजाळे, महानगर संयोजक मकसूद खान यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकत्र आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवले. फटाक्यांची आतशबाजी केली. एकमेकांना मिठाई भरवली. विजय चक्रे, अरविंद कांबळे, सुगदेव गोपनारायण, काजी लायक अली, ज्ञानेश्वर साखरकर, प्रमोद मेश्राम, संतोष दाभाडे, गजानन भटकरसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काय झाले कोर्टात?

अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. प्रचार 48 तास अगोदर संपतो. असे सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत. अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. पंजाबमध्ये 25 मे तर दिल्लीत 1 जूनला मतदान पार पडणार आहे.

Supreme Court granted bail : 51 दिवस तुरुंगात, अरविंद केजरीवाल यांची तिहारमधून सुटका

जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टात पाठवला जाईल. ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल. तिहार तुरुंग प्रशासन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडेल. त्यानंतर अरविंद केजरीवालांना सोडले जाईल. ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!