महाराष्ट्र

Navneet Rana :  नवनीत राणा यांच्या विरोधात तेलंगणात गुन्हा दाखल

Election Commission :  निवडणूक आयोगाने केली तक्रार

Navneet Rana : लोकसभा खासदार आणि अमरावती मतदारसंघातील भाजपा उमेदवार नवनीत कौर राणा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून तेलंगणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून नवनीत राणाविरुद्ध शादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसला मत म्हणजे काँगेसला मतदान

झहीराबादमध्ये नवनीत राणा यांनी काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे असल्याचे म्हटले होते. दरम्यान, नवनीत राणा यांचे हे विधान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले आणि अनुचित टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार बीबी पाटील यांच्या प्रचारासाठी जहीराबाद लोकसभा मतदारसंघातील संगारेड्डी येथे आल्या होत्या.

अधिका-यांनीच केली राणा विरोधात तक्रार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना नवनीत राणा यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह वाटल्याने कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी राणा यांच्या विरोधात तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढील कारवाई शादनगर पोलिस करणार आहेत. परंतु यामुळे नवनीत राणा यांच्या अमरावती मतदारसंघात मात्र खळबळ उडाली.

Maharashtra Lok Sabha election : आम्हाला केवळ 15 सेकंद द्या

नवनीत राणा यांनी तेलंगणा दौ-यात एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी 15 वर्षापूर्वी केलेल्या वक्तव्याला दिलेल्या उत्तरा वरुन बरेच वादळ उठले. आरोप प्रत्यारोपाने लोकसभा निवडणुकीत आपल्या परीने वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!