महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : ही वैचारिक दिवाळखोरी, तेव्हा काँग्रेसचे सरकार होते ना

Nilam Gorhe : दहशतवादी हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे

Shivsena : दहशतवादी कसाबच्या वेळी गोळ्या कोणाच्या होत्या असा वाद उत्पन्न झाला आहे. तसेच घटना घडली तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय गृहमंत्री देखील काँग्रेसचे होते. 2008 पासून 2014 पर्यंत कसाबला फाशी देण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार झाले. म्हणजे तपास न करता काहीतरी निर्णय त्यांनी घेतला असे म्हणणे म्हणजे स्वतःच्या वैचारिक दिवाळखोरीच हे उदाहरण आहे अशी टीका केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर त्यांनी अप्रत्यक्षपणे हल्ला केला. ते वक्तव्य बेजबाबदारपणाचे असे त्या म्हणाल्या.

शेवटी.. केंद्र आणि राज्य सरकार मतैक्याने काम करताहेत

विधिमंडळातील याबाबतची प्रोसिडींग काढली तर प्रत्येकाने कसाबच्या फाशीचे स्वागत केलेलं आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यातील विसंगती जनतेच्या लक्षात नक्कीच येईल यात काही शंका नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बेफाम वक्तव्य केली जात आहेत. त्यांचं बोलणं हे वस्तुस्थितीला सोडून असून ते धादांत खोटे बोलत आहेत. विकासाच्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून अशी विधान काही लोक करत आहेत. मात्र जनता अशा लोकांना कधीच थारा देणार नाही, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

शिर्डी येथे गुरुवारी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. राज्यात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले. त्यामुळे 13 मे आणि 20 मे रोजी मतदान आहे. मुद्द्यांवर बोलण्याऐवजी आरोप प्रत्यारोप, बदनामी यांसोबतच गैरसमजाचा धुराळा याच्यामुळे मतदार उदासीन होतोय का अशी शंका वाटत आहे. आजवरची मतदानाची टक्केवारी बघता ती 60 ते 65 टक्क्यांपर्यंत राहिलेली आहे.

Terror Attack : वादग्रस्त विधानानंतर विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये एकाकी

काल शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोपरगाव येथे सभा झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी देखील या सभेला संबोधित केले. हा मतदारसंघ मागासवर्गीय लोकांसाठी राखीव आहे. समाजाचा दुजाभावाचा सामना आजही अनुसूचित जातीच्या लोकांना करावा लागतोय परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे कार्य चाललेलं आहे.यामध्ये सुदैवाने दलित विरुद्ध दलित असे मतभेद या सरकारच्या काळात झालेले नाहीत. मतैक्यानेच केंद्र व राज्य सरकारे काम करत आहेत असे त्या म्हणाल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!