Political war : 15 वर्षापूर्वी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी आम्हाला 15 मिनिटे द्या ठीक करू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना खासदार नवनीत राणा यांनी केवळ 15 सेकंद द्या असे सांगून ओवेसी यांना उत्तर दिले. भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारार्थ हैदराबाद येथे त्या बोलत होत्या.
ओवेसी बंधू हैदराबाद मध्ये जो अजेंडा राबवित आहेत त्याला विरोध करण्यासाठी आपण वक्तव्य केल्याचे नवनीत राणा सभेनंतर म्हणाल्या. तर, उमेदवार माधवी लता म्हणाल्या, 15 सेकंद मतदानासाठी हवे आहेत. अन्य कोणताही अर्थ त्यामागे नाही.
दरम्यान राणांच्या वक्तव्याला असुदुद्दीन ओवेसी यांनीही उत्तर दिले. धमकीला आम्ही घाबरत नाही. तर सामना करू असे ते म्हणाले.
काय म्हणाल्या नवनीत राणा
नवनीत राणा यांनी हैदराबादमधील प्रचार सभेत बोलताना अकबरुद्दीन ओवैसींच्या 15 मिनिटांच्या वक्तव्यावर 15 सेकंदांचं चॅलेंज दिले होते. 15 सेकंद पोलिस हटवले तर ते कुठून आले आणि कुठे गेले हे त्यांना समजणार नाही, असं राणा यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे राणांच्या टिकेल असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 15 सेकंद नाही, एक तास देतो. तुम्ही काय करू शकता सांगा? तुम्ही जास्तीत जास्त अखलाक किंवा मुख्तार अन्सारीबरोबर जे झालं ते आमच्याबरोबर कराल. तुमच्यात किती माणुसकी शिल्लक आहे, मला बघायचं आहे. तुम्हाला कोण घाबरतं? आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तयार आहोत. पंतप्रधान तुमचा, प्रशासन तुमचं, तुम्हाला कोणी अडवलंय? आम्हाला कुठं यायचं ते सांगा..आम्ही येऊ”, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली. आता यावर पुन्हा नवनीत राणा यांनी ओवेसींना उत्तर दिलं आहे. आज जळगाव मध्ये बोलताना राणांनी विधान करीत आपल्या त्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.
नवनीत राणांचे प्रत्युत्तर
ओवेसी यांच्या विधानावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, मी कुणालाही घाबरत नाही. ओवेसी बंधूंनी जे म्हटलं होतं की, सर्व पोलिस हटवून द्या आणि आम्हाला पंधरा मिनिटे द्या. हिंदुस्तान मध्ये मागासवर्गीय आणि इतर समाजाचे लोक राहतात जे हिंदू विचारांचे आहेत. मात्र जे लोक येथे राहतात आणि पाकिस्तानच्या अवलादी आहेत. त्या येऊन आम्हाला धमक्या देत असतील तर त्यांना उत्तर दिले जाईल असा इशारा राणा यांनी दिला आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. संसदेत फक्त एकमेव ओवेसी असे सदस्य होते ज्यांनी 33 टक्के महिला आरक्षणाला विरोध केला होता. जे हिंदुस्थानात राहून पाकिस्तानचे गोडवे गातात अशा लोकांना आम्ही खपवून घेणार नाही. असेही राणा म्हणाल्या.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. पाकिस्तानवरून राहुल गांधी आणि काँग्रेससाठी प्रेमाचे संदेश आणि पत्र येत आहेत. जोपर्यंत काँग्रेसची सरकार होती तोपर्यंत भारत हा काँग्रेस पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचवण्याचं काम राहुल गांधी आणि काँग्रेसने केलं होतं. आता नरेंद्र मोदींचे सरकार आहे पाकिस्तानी लोकांचे इथे काहीही चालणार नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आहोत त्यामुळे जेव्हाही मैदानात उतरलो तेव्हा म्यानातून तलवार नेमकी कशी काढायची यासाठी आम्हाला विचार करण्याची गरज पडत नाही. असं ही राणा म्हणाल्या.