प्रशासन

ACB Trap : तहसीलदार भदाणे यापूर्वीही झाले होते ट्रॅप

Habitual : ठाणे नंतर गोरे गावात सापडले रंगेहाथ

Goregaon Tehsildar : गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गोरेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि एका खासगी व्यक्तीला मंगळवारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला असून तहसीलदार भदाणे यांनी यापूर्वीही 10 लाखाची लाच घेतल्याचा गुन्हा ठाणे पोलिस ठाण्यात नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. भ्रष्ट अधिका-यांना सरकार पाठीशी कसे घालते ही चर्चा जनमानसात होत आहे.

तेढा येथील तक्रारदार आणि त्याच्या मित्राचा टिप्पर रेतीसह गिधाडी शिवारात मंडळ अधिकारी आणि त्यांच्या पथकाने पकडला होता. 4 मार्च रोजी कारवाई झाली होती. ते टिप्पर गोरेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे (वय 50), नायब तहसीलदार ज्ञानेश्वर नागपुरे (वय 56) यांनी संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत खासगी व्यक्ती राजेंद्र गणवीर (वय 52) याच्या माध्यमातून टिप्पर चालकांना 1 लाख रुपयांची लाच मागून टिप्पर सोडणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार तक्रारदाराने याबाबतची तक्रार गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी (दि. 7) 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

Shivsena  : शिवसेनेचे पुन्हा ‘या’ मागणीसाठी ठिय्या आंदोलन!

आता तहसीलदार किसन भदाणे यांच्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. ते ठाणे येथे तहसीलदार म्हणून 2017 मध्ये कार्यरत असताना त्यांनी 10 लाख रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांना अद्दल घडूनही असे कृत्य करण्यास मागे-पुढे पाहात नसल्याचे दिसून येत आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्याना सरकारचे पाठबळ?

दरम्यान एका वरिष्ठ महसूल अधिका-याला यापूर्वीच लाचलुचपत प्रकरणी अटक केल्यानंतर पुन्हा त्यांना महसूल सेवेत परत घेणे हा सरकारचा निर्णय चुकीचा ठरत असल्याची ओरड सुरु झाली आहे. यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भदाणे सारख्या प्रवृत्ती वारंवार तसले कृत्य करायला मोकळे होतात हेही बोलले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!