Vanchit Aghadi News : वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर फेसबुक लाईव्ह करीत वंचित मधील वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. उमेदवारी साठी सेटलमेंट केली जाते असे ते म्हणाले होते. वंचित बहुजन आघाडीने त्याची दखल घेऊन पोलिस स्टेशनला तक्रार केली.
ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना काही वरीष्ठ पदाधिकारी भेटून दिशाभूल करतात. तसेच उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर सेटलमेंट केल्या जाते. असे नमूद केले होते. पक्षाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे.
वंचितचे घाटाखालील जिल्हाध्यक्ष देवा हिरवाडे यांनी बुधवारी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार नोंदवली. या तक्रारीमध्ये नमूद केले की, वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती फेसबुकच्या माध्यमातून मिळाली. राजीनामा देताना उमेदवारीसाठी सेटिंग करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra Lok Sabha Election : आजही माझा परिवार एका बाजूला
तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात आहे. सेटलमेंट करून पदाधिकाऱ्यांना डावलल जात आहे. त्यांना लाचार केल जात आहे., ज्या उमेदवाराची केवळ आणि केवळ पराभवाची पार्श्वभूमी आहे त्यांना दलाली करून उमेदवारी दिली जात आहे, यासह अनेक गंभीर आरोप सतीश पवार यांनी केले आहेत. पक्ष सेटलमेंट करतो आणि उमेदवारी देतो असा थेट आरोप केला असल्याने पक्षाची बदनामी झाली आहे.असे नमूद केले आहे.
धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप
वंचित चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. पवार यांना या आधीच कारणे दाखवा नोटीस दिली होती. सतीश पवार केलेल्या आरोपाबाबत कुठलेही पुरावे दिले नाहीत. पक्षा विरुद्ध आणि उमेदवारी मिळविण्यासाठी करीत असलेल्या कृतीमुळे आणि पक्ष नेतृत्वाकडून दिलेल्या उमेदवाराला सहकार्य केले नसल्याने वंचितचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा यांनी 4 मे रोजी पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच खुलासा मागून हकालपट्टी का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. मात्र,त्यांनतर पवार यांनी थेट राजीनामा देत पक्षावर गंभीर आरोप केले होते.