Bhandara Gondia constituency : भंडारा- गोंदिया लोकसभेसाठी मतदान संपताच सोशल मीडियावर निकालाचा कल घेतला जात आहे.सोशल मीडियावर सकाळचे गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मेसेजच्या ठिकाणी आता कोण येणार निवडून, आपली मते नोंदवा, अशा मेसेजद्वारे निवडणूक निकालाचा कल घेतला जात आहे.
यामध्ये मतदार, मित्रमंडळी आपापले मत व्यक्त करीत आहेत. कोणी कमळ, तर कोणी पंजा, असे मत व्यक्त करीत असल्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होईल, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.
या सर्व घडामोडीत सोशल मीडियावर काही जणांनी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यामध्ये तर काही असेही आहेत की ज्यांच्या उमेदवारांचा कुठेच थांगपत्ता नाही ते सुद्धा आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत आहेत. यामुळे यातून मनोरंजनसुद्धा होत आहे.
Maharashtra Lok Sabha Election : महायुतीतील घटक पक्षांचा समन्वय यश हमखास मिळवून देईल
भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक 19 एप्रिल रोजी शांततेत पार पडली. एकूण 18 उमेदवारांचे भाग्य ‘इव्हीएम’ मध्ये बंद झालेत. आता 4 जून रोजी निकाल लागणार आहे. तत्पूर्वी फेसबुक, व्हॉट्सएप, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर काही जण कल घेत आहेत. या निवडणुकीच्या निकालावर विधानसभेचे बरेच समीकरण अवलंबून आहे. त्यामुळे आमदारांना सुध्दा लोकसभेच्या निकालाची चिंता लागली आहे.त्यामुळे या सोशल मीडियाचा निकालाच्या येणाऱ्या कलामुळे कही खुशी कही गमचे वातावरण पाहायला मिळत आहे.