महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : आरोग्य यंत्रणा देणार मत टक्का वाढीसाठी ‘बुस्टर’ डोस

Health Workers Help : मतदान केंद्रांवर उभारणार पाळणा घर

Raver Constituency : रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात गरोदर माता, दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर उपाय योजना राहतील. विशेष म्हणजे मतदान केंद्रावर पाळणा घर देखील असेल.

आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून आरोग्य विभागाच्या पथका सोबतच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मे महिन्यात तापमानाचा पारा वाढू शकतो हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 61 हजार गरोदर माता आहेत. वाढत्या उन्हाचा परिणाम गरोदर मातांच्या प्रकृतीवर होऊ नये व दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकडे लक्ष दिले जात आहे.

Maharashtra Lok Sabha Election : पवारांच्या भांडणात आमदार मिटकरींची उडी

यंत्रणा सज्ज

सकाळी ऊन वाढण्यापूर्वी या तीनही घटकातील मतदारांनी उस्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. अलीकडे बाळंत झालेल्या महिलांना बाळासोबत मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता पाळणा घर देखील स्थापन करण्यात येणार आहे. घरगुती कामात व्यस्त महिलांना मतदान करता यावे म्हणून काही वेळ सुट्टी देण्यात यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन हजार आशा स्वयंसेविका व 3 हजार 941 अंगणवाडी सेविका या कामात सहभागी होणार आहेत.

 केंद्राचा बाहेर आरोग्य पथक

कडाक्याच्या उन्हामुळे मतदारांना काही त्रास उद्भवल्यास आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहे.वाढते ऊन ,आरोग्य आणि इतर कारणामुळे मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करावी. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!