महाराष्ट्र

Split in Congress : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला गळती

Pravin Darekar : शेकडो कार्यकर्ते दरेकरांच्या उपस्थितीत भाजपात

Bjp vs Congress : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतच काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. 

भाजपा महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पार्सेकर यांच्या नेत्तृत्वात वॉर्ड क्रमांक 12 मधील वॉर्ड उपाध्यक्ष हरीश धोडिया, माजी ब्लॉक अध्यक्ष सिद्धेश पार्सेकर, वॉर्ड सचिव यश साळवी, वॉर्ड उपाध्यक्ष गणेश गामाटे, अशोक नवले, तालुका उपाध्यक्ष तृप्तेश पार्सेकर, वैभव आचरेकर, रघु सोलंकी, किरण पटेल, रवी चरण, किरण मोरबीया, गोपाल जाधव, मुकेश रजपूत, धवल थापा यांनी दहिसर येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपात प्रवेश केला. आमदार दरेकर यांनी सर्वांचे भाजपाचा झेंडा हाती देत पक्षात स्वागत केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!