Buldhana Crime News : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे वन विभागाचा सालई गोंद अवैधरित्या जमा केल्याबाबत एकावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु या गुन्हा दाखल झालेली व्यक्ती आरोपी न दाखविण्यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने दहा हजारांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी वनपाल शेख कलीम याला दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक (एसीबी बुलढाणा) शितल घोगरे, निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक फौजदार श्याम भांगे, हवालदार प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे, अर्षद शेख यांनी पार पाडली. पंचासमक्ष आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली.
Tumsar Nagar Palika : माजी नगरसेवकाने असे काही केले; ‘त्या’ महिलेसाठी सगळे आक्रमक झाले
..तर आमच्याशी संपर्क साधा
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधा. त्यासाठी दूरध्वनी कमांक 07262-242548 आणि 9657066455 तसेच टोल फ्री कमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उप अधीक्षक शितल घोगरे, अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी केले आहे.