Sule Meets Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. 7 मे रोजी मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या बारामतीतील घरी पोहोचल्या.
त्या घरी जाण्यामागे नेमके काय कारण? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. अजित पवारही त्यावेळी घरीच उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांंची भेट पूर्वनियोजित होती की अचानक त्यांनी भेट दिली हे कळू शकले नाही. मात्र, मतदारांमध्ये व राजकीय जाणकारांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नणंद विरुद्ध भावजय
बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना आहे. परंतु सुप्रिया सुळे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वैयक्तिक टीका करणे टाळले. त्यांनी आपल्या प्रचाराचा भर विकासकामांवरच ठेवला होता. मागच्या दहा वर्षांत केलेली कामे आणि भविष्यात करणारी कामे यावरच त्या बोलत होत्या. अजित पवारांनी अनेकदा कौटुंबिक वादावर जाहीर भाष्य केले. मात्र, त्यालाही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले नाही. आता त्या अजित पवारांच्या घरी गेल्याने चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Lok Sabha Election : दादा, राणे, शिंदे, सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बहीण भावाचे नाते आहे. परंतु निवडणुकीत प्रतिस्पर्धी असल्याने भेटीची चर्चा होणे साहजिक होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भेट नेमकी कशासाठी होती ही बारामतीत सुरू झालेली चर्चा सर्वदूर पसरली.