महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : विक्रमवीर मुनगंटीवार यांनी खास ‘या’साठी सुरू केला व्हॉट्सॲप नंबर..

Water Scarcity : पाणी टंचाईचा आढावा घेण्याची कार्यकर्त्यांना सूचना

Chandrapur BJP : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. आपल्या याच कार्यपद्धतीमुळे मुनगंटीवार लिमका बुक असो की गिनेज बुक नेहमीच विक्रमवीर ठरले आहेत. अशाच आगळ्यावेगळ्या कार्यशैलीचा परिचय त्यांनी पुन्हा एकदा करून दिला आहे. यंदा मुद्दा आहे पाणी टंचाईचा. उन्हाळ्यात दरवर्षी राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवते. प्रशासकीय यंत्रणा यावर उपाय करीत असते. परंतु मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी वेगळा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासकीय यंत्रणा टंचाई निवारणासाठी काम करीत आहे. मात्र तुम्हीही टंचाईच्या विषयाकडे लक्ष ठेवा. नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, यासाठी वेळीच मला कळवा अशा सूचनाच मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांना त्यांच्याशी संपर्क करणे सोयीचे व्हावे म्हणून खास व्हॉट्सअॅप क्रमांकही सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी चंद्रपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांना सूचना केली आहे.

‘ग्राऊंड रिअॅलिटी’ तपासणार

लोकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जल जीवन मिशनच्या माध्यमातून, ‘हर घर कनेक्शन’चे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. या योजनेतून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. तरी अशा योजना सुरू झाल्या की नाही, याची माहिती घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

Lok Sabha Election  : भाजपच्या 5 नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्लॅन

चंद्रपूर जिल्ह्यातील बोअरवेल, विहिरी, हॅण्डपंप, वॉटर एटीएम, घरांमधील नळ कनेक्शन याबाबत सविस्तर माहिती कार्यकर्ते घेणार आहेत. ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्याची कारणे शोधण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी 845 स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. यापैकी ज्या योजनांचे वीजबिल थकीत असेल ते तातडीने भरण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला यापूर्वीच दिल्या आहेत. अशात आता भाजपचे कार्यकर्ते जिल्ह्यातील टंचाईवर देखरेख ठेवणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!