Rashtravaadi Congress : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त होते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभांमधून जनतेला संबोधित केले.त्यामुळे त्यांचा घसा बसला असून प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
प्रकृती अस्वस्थ असल्याने शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये शरद पवारांची सभा होती. ही सभा आता रद्द करण्यात आलेली आहे.
7 मे रोजी बारामतीत मतदान होणार आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. अशात त्यांची प्रकृती बिघडल्याने आज त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द झाले.
Lok Sabha Election : मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास निवडणुकाही होणार नाहीत
अशी ही भाविक पोस्ट
कार्यक्रम रद्द करण्यात आले. रविवारी रात्री शरद पवार गटाने ही घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनावणेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
तुम्ही प्रकृतीला जपा. विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो असे बजरंग सोनावणेंनी म्हटले आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. प्रकृतीच्या
कारणास्तव माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजले आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबवू शकला नव्हतात. पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबवू शकला नाही.
तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानाने आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.
अजित पवारांचे निकटवर्तीय बजरंग सोनावणे यांनी गेल्या महिन्यात अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. याचवेळी त्यांना शरद पवार गटाकडून बीडमध्ये उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. बजरंग सोनावणे या बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून मविआचे उमेदवार आहेत. यापूर्वी 2019 मध्येही बजरंग सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात बीड लोकसभा निवडणूक लढवली होती.