महाराष्ट्र

Lok Sabha Election : हेमंत करकरे कसाबच्या नव्हे संघाच्या गोळीने मेले

26/11 Terror Attack : विजय वडेट्टीवार यांचे उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप

Congress on BJP : लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशात विधानसभेतील विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक विधान केले आहे. या विधानामुळे राज्यातील तापलेल्या राजकारणात अधिक भडका उडाला आहे. 26/11 ला मुंबईत झालेल्या हल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले. करकरे यांना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या बंदुकीतली नव्हती, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

प्रसिद्ध वकील तसेच भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून गुपीत ठेवले. असा आरोपदेखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आयपीएस हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. संघाशी समर्थित एका पोलिस अधिकाऱ्याने झाडलेली होती. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून गुपीत ठेवलेले हे सत्य आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. या विधानावर स्पष्टीकरण देत वडेट्टीवार म्हणाले की, एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन मी हे विधान करत आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नाही. विलासराव देशमुख त्यावेळी बोलले होते की, दहशतवादी कसाबला फाशी झाली. याचे श्रेय घेण्याची अजिबात गरज नाही.

Lok Sabha Election : उज्ज्वल निकम कसले वकील ते तर देशद्रोही..

फाशी निश्चित होती 

मुळात कसाब हा दहशतवादी होता. त्याला फाशी होणार हे निश्चितच होते. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. यानंतर वडेट्टीवार पुन्हा म्हणाले की, मी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आहे. यावर उज्ज्वल निकम यांना काही उत्तर द्यायचे असेल तर त्यांनी द्यावे. मुंबईत झालेल्या त्या दहशवादी हल्ल्याचे पुरावे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये सादर करायला पाहिजे होते. ते त्यांनी केलेच नाहीत, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे राजकरणात तणाव निर्माण झाला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या उज्ज्वल निकम यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. भाजपाच्या नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानाला आता प्रत्युत्तर दिले आहे.

नवीन वाद 

विजय वडेट्टीवार यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार यांनी संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होणार आहे. ऐन लोकसभा निवडणूक काळात हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गेली अनेक वर्ष उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी खटले लढवले आहेत. ते आतापर्यंत विशेष सरकारी वकील होते. आता ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधक त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!