Voting Percentage : निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांची अंतिम टक्केवारी 11 दिवसानंतर जाहीर केल्यामुळे या आकडेवारीवर आता विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप करत निशाणा साधला आहे. तर, या दाव्यांची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.निवडणूक आयोगाने माती खाल्ली असून मतदानानंतर 11 दिवसांनी टक्केवारी वाढली कशी? असा परखड सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला.
सर्वच टक्केवारीत वाढ दाखविण्यात आली आहे. चंद्रपूर येथे तर सुरुवातीला 60.35 असलेली टक्केवारी 67.55 दाखविण्यात आली आहे. निवडणूक आयोगावर केंद्रातील सरकारचा दबाव असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यात आता हा टक्केवारीचा घोळ समोर आला आहे. निवडणूक आयोगाने भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी तर हा घोळ तर केला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Lok Sabha Election : प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे निवडणुकीनंतर भाजपात जातील
भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा हे आम्ही म्हणतो त्याला एकप्रकारे दुजोरा देण्याचाच हा प्रकार आहे. निवडणूक आयोग मोदी-शहांच्या पकडीत गुदमरलेला आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.
लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून 13 मतदारसंघामध्ये मतदान झाले आहे. त्यावेळी सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी 59.56 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगानेच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले होते. परंतु आता यात वाढ करुन या तेराही मतदारसंघातील अंतीम आकडेवारी ही 62.71 टक्के जाहीर करण्यात आली. साधारणता 3.08 टक्के यात वाढ दाखविण्यात आली.