Political War : ज्या उज्ज्वल निकम यांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले होते. कसाबला कोणी बिर्याणी देईल का असे विचारुन वडेट्टीवार म्हणाले.उज्वल निकम कसले वकील ते तर देशद्रोही. न्यायालयात पुरावे द्यायला पाहिजे होते ते दिले नाही अशी टीका देखील केली.
वडेट्टीवार गुरुवारी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ॲड. निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने उमेदवारी दिल्या नंतर मुंबई हल्ला प्रकरण चर्चेत आले आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात वडेट्टीवार बोलत होते.
हेमंत करकरे यांचा खून झाला ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. तर ती एका पोलिस अधिकाऱ्याची होती. तोही आरएसएस समर्पित. त्यावेळी हे सत्य कोर्टापासून लपवले. अशा देशद्रोह्याला जर तिकीट भाजप देत असेल तर तर हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा भाजप का हा प्रश्न येतो असा गंभीर आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.
Lok Sabha Election : निवडणुकीत हे स्टार प्रचारक राजकारण तापविणार ?
मी राजकारणात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली : निकम
मी राजकारणात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी केली आहे.
उज्ज्वल निकम यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, महाविकास आघाडीने काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे यावेळी मुंबई उत्तर मध्य लोकसभेत उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना रंगणार आहे.