महाराष्ट्र

Lok Sabha Election : विदर्भातील निवडणूक आटोपली आता नेत्यांचा उर्वरित महाराष्ट्रात प्रचार 

Maharashtra Politics : भाजपचे अनेक खासदार, आमदार, मंत्री पक्षकार्यात 

Vidarbha BJP : पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आहे. एक दोन टप्प्यांमध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भातील मतदान आटोपले आहे. सहसा मतदान आटोपल्यानंतर संबंधित प्रदेशातील नेते रिलॅक्स मूडमध्ये असतात. मात्र भाजपमध्ये एका प्रदेशातील निवडणूक आटोपताच आमदार, खासदार आणि मंत्र्यांना महाराष्ट्राच्या अन्य भागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये ‘चारसौ पार’चा नारा दिला आहे. महाराष्ट्रात महायुतीला 45 जागांवर विजय मिळवायचा आहे. अशात पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपने आपल्या प्रचार तंत्रात बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली. यातून धडा घेत महायुतीने दुसरा टप्प्यातील मतदानादरम्यान भाजपचा पारंपरिक मतदार घराबाहेर पडेल याची पूर्ण काळजी घेतली. त्यामुळेच पश्चिम विदर्भामध्ये मतदानाची टक्केवारी समाधानकारक ठरली. आता पूर्व आणि पश्चिम विदर्भातील मतदान पूर्ण झाल्याने या भागातील नेत्यांना प्रचारासाठी अन्यत्र पाठवण्यात आले आहे.

कोणाची नेमणूक कुठे?

प्रदेश भाजपने विविध लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आमदार व अन्य नेत्यांची नेमणूक केली. आमदार डॉ. पंकज भोयर यांना अलिबाग येथे पाठविण्यात आले आहे. समीर कुणावर पेणमध्ये कामाला लागले आहेत. प्रताप अडसड महाड येथे कार्यरत आहेत. रामदास आंबटकर राजापूर येथे प्रचार करीत आहेत. विकास कुंभारे यांना दापोली येथे तर कृष्णा खोपडे गुहागर येथे प्रचार करीत आहेत. राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना उर्वरित लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय जबाबदारी मिळाली आहे. खासदार रामदास तडस यांना उत्तर कराड मतदारसंघ देण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार हे देखील भाजपचा व्यापक प्रचार करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष असल्याने आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि दिल्ली प्रचंड वजन असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात सर्वत्र प्रचार करीत आहेत.

Lok Sabha Election : गावकरी मतदानावर बहिष्कार टाकणार

महाराष्ट्रातील स्टार प्रचारक 

देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, अशोक चव्हाण, अजित पवार, गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पियूष गोयल, चंद्रकांत पाटील असे एकूण 40 नावे स्टार प्रचारक म्हणून जाहीर केली आहे.नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करीत आहेत. नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहारची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस हे मध्य प्रदेशात काम करणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!