महाराष्ट्र

NMC Election : सीमांकनातील बदल माजी नगरसेवक आणि इच्छुकांसाठी ठरणार डोकेदुखी !

Mahavikas Aghadi Government : मविआ सरकार असताना 2022 मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता

Nagpur : महायुती सरकारने मुंबईवगळता सर्वच महापालिकांत पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूर महापालिकेत 2017 नुसार प्रभाग व नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे. परंतु प्रभागाचे सीमांकन तसेच आरक्षण बदलण्याची शक्यता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षांपूर्वी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार सीमांकन व आरक्षणही काढण्यात आले होते. 

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच माजी नगरसेवक प्रतीक्षेत आहेत. महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्न अजूनही कायम आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे 2017 नुसारच प्रभाग राहतील, अशी अपेक्षा माजी नगरसेवकांनी व्यक्त केली. मविआ सरकार असताना 2022 मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता.

प्रभागाची संख्या 52 व नगरसेवकांची संख्या 156 करण्यात आली होती. त्यानुसार आरक्षणही काढण्यात आले होते. त्यामुळे माजी नगरसेवकांनी त्रिसदस्यीय पद्धतीनुसार आपापल्या भागांमध्ये लोकांशी गेल्या दोन वर्षांत संपर्कही वाढवला होता. आता पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आल्याने माजी नगरसेवकांना पुन्हा उजळणी करावी लागणार आहे.

आरक्षण बदलण्याची शक्यता.. 

2017 नुसार चार सदस्यीय प्रभाग पद्धतीच कायम राहणार असली तरी वाढीव मतदारांची संख्या लक्षात घेता आरक्षण बदलण्याची शक्यता महापालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर काही प्रमाणात प्रभागाच्या सीमाही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. आता चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार 38 प्रभाग राहतील व नगरसेवकांची संख्याही 152 राहील. परंतु आरक्षणात तसेच सीमांकनात होणारे बदल माजी नगरसेवक तसेच इच्छुकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणालाही पालकमंत्र्यांची दांडी!

2017 नुसार प्रभाग पद्धती (हिच पद्धती आता कायम राहण्याची शक्यता) 

एकूण प्रभाग ः 38

चार सदस्यीय प्रभागांची संख्या ः37

तीन सदस्यीय प्रभागाची संख्या ः 1

नगरसेवकांची संख्या ः 152

एका प्रभागात सरासरी मतदार : 65 हजार (कमीत कमी 60 तर जास्तीत जास्त 71 हजार मतदार)

2022 मधील त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती 

प्रभागाची संख्या ः 52

नगरसेवकांची संख्या ः 156

एका प्रभागात जास्तीत जास्त मतदार ः 52 हजार

एका प्रभागात कमीत कमी मतदार ः 43 हजार

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!