महाराष्ट्र

Lok Sabha Election : निकम करतील आता ‘राजकीय’ वकिली ?

Hot Topic : जळगावचा कट्टा चर्चेतून विषय गरम

Bjp news : प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. मूळचे जळगावचे असणारे निकम आता ‘राजकीय’ वकीली करतील का, अशी चर्चा राजकीय कट्ट्यावर, जनमानसात रंगू लागली आहे.

भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. ही बातमी सोशल मीडियावर आली आणि जळगावचा कट्टा गरम झाला. अनेकांनी अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्या वकिलीच्या कामकाजाचे किस्से सांगायला सुरुवात केली आहे.

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता भाजपने कट केलाय. पूनम महाजन या दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. 2014 आणि 2019 साली पूनम महाजन यांनी याच मतदार संघातून विजय मिळवला होता. मात्र, आता पूनम महाजनांचा पत्ता कट करत भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे आता नेमका विजय कोणाचा होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

वडील बॅरिस्टर देवराम निकमही होते आमदार

अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त केली हे सर्वज्ञात आहे. राजकीय वारसा त्यांना आहे. निकम यांचे वडिल बॅरिस्टर देवराम माधवराव निकम हे 1962 ते 1967 या काळात आमदार होते. महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्याशिवाय जिल्हा मार्केटींग फेडरेशनची स्थापना बॅ. निकम यांनी केली आहे. निकम कुटूंब मंगरुळ (ता. चोपडा) येथील मूळ रहिवासी आहेत.

Lok Sabha Election : मुस्लिम समाजाने 100 टक्के मतदानाची केली प्रतिज्ञा !

दोन वेळा नावाची चर्चा, तिसऱ्यांदा तिकीट

आपण राजकारणात येणार नाही असे अ‍ॅड.उज्ज्वल निकम वारंवार सांगत होते. तरी, जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी सलग दोन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या नावाची चर्चा झाली; परंतु त्यांना अखेर उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली. कायद्याचे क्षेत्र त्यांनी गाजवले तसेच राजकारणातही ते ठसा उमटवतील असा विश्वास त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!