महाराष्ट्र

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मतदारांची नावे गहाळ, जिल्हाधिकाऱ्यांचा बीएलओंना इशारा !

Local Politicians : बीएलओंनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, नेत्यांची मदत घेतल्यास फायदा होईल

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी झाला आहे. याच्यासाठी विविध कारणे जोडण्यात येत असली तरी अनेकांची नावे गहाळ झाले ही वस्तुस्थिती आहे. ‘बूथ लेवल ऑफिसर’ (बीएलओ) यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणाचा फटका मतदारांना बसल्याचे दिसते.

आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नवीनसोबतच गहाळ झालेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट होणे गरजेचे आहे. मतदान केंद्रांतही बदल झाल्याने त्याची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बीएलओंना प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून आवश्यक माहिती गोळा करून मतदारांनाही माहिती देणे गरजचे आहे. यावेळी तरी बीएलओ हे सर्वेक्षण योग्यरित्या करतील का, हाच खरा सवाल आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानात ‘डिस्टिंक्शन’ घेण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले होते. त्या दृष्टिकोनातून विविध प्रयत्नही सुरू केले. नव मतदारांच्या नोंदणीवर भर दिला. त्याचा परिणामही दिसून आला. मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मतदानापूर्वी त्याला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे दिसून आले. परंतु प्रत्यक्षात ते दिसले नाही.

Nagpur ZP : झेडपी सदस्यांच्या निधीला लागणार कात्री, दोघांचा निधी होणार वळता

नागपुरात मतदानाचा टक्का 55 पारही झाला नाही. तर रामटेकमध्ये तो 63 च्या वर गेला नाही. मतदारांना त्यांची नावे गहाळ झाल्याचे दिसणे व मतदार केंद्राचा पत्ता न लागणे ही मतदान कमी होण्याची प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले. मतदानाच्या पूर्वी बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यात मृत तसेच दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. इतर ठिकाणी स्थानांतरित झालेल्यांची नावे ही कमी करण्यात आली. सव्वा ते दीड लाख अशा मतदारांची वगळण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.

हे सर्वेक्षणच प्रशासनाच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण चुकीचे झाल्याची टीका आता होवू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना अशा दोषी बीएलओंवर कारवाईचा इशाराही दिला आहे. गहाळ झाल्याचे नावे समाविष्ट करण्यासाठी विशिष्ट अर्ज नमुना भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. प्रत्यक्षात फारच कमी मतदार हा अर्ज भरतील, असे सध्या तरी दिसते. त्यामुळे बीएलओंमार्फतच घरोघरी जाऊन पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

घरीच अर्ज भरून घेतल्यास नाव पुन्हा समाविष्ट होणार..
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आताच मतदान केंद्राची माहिती मतदारांना मिळायला हवी. नावे कमी करताना योग्यरीत्या पंचनामा झाला पाहिजे. बीएलओंनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, नेत्यांची मदत घेतल्यास फायदा होईल, असे प्रशासनातील तज्ञ मंडळी सांगतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!