महाराष्ट्र

Lok Sabha Election : राऊतांनी शिवसेना, तर जितेंद्र आव्हाडांनी घेतली तुतारी गट संपवण्याची जबाबदारी !

Sunil Tatkare : सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मांमध्ये, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करत आहेत

Lok Sabha Election : सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मांमध्ये, जातीजातींमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी महाड शहरातील जाहीर प्रचार सभेत सोमवारी (ता. 29) केला. 

अयोध्येत राममंदिर झाले. त्याचसोबत अयोध्येत बाबरी मशीदीचेही काम सुरू आहे. हे कधी ते लोक सांगत नाहीत मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून मेसेज केले जातात. सामाजिक सामंजस्य जपणारे आम्ही आहोत. परंतु कुणी कुणाच्या नावाने दंगा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही, असा थेट इशाराही सुनील तटकरे यांनी यावेळी दिला.

फाळणी होत असताना शेजारच्या देशात गेले त्यांना मातृभूमीत परत यायचे असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट शिथिल केली हा सीएएचा कायदा आहे. या देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांसोबत चुकीचे काही घडणार नाही. माझे आवाहन आहे उद्धव ठाकरे, अनंत गीते यांना की, त्यांनी सीएए कायदा काय आहे हे जनतेला सांगावे. पण समाजासमाजांमध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न ही जातीयवादी मंडळी करत आहे, अशी घणाघाती टीका सुनील तटकरे यांनी केली.

व्हॉटसअॅप मेसेज निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर या परिसरातील, देशातील, राज्यातील मुस्लिम समाजाने आमचा धर्मनिरपेक्ष विचार बघावा, असे आवाहनही सुनील तटकरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता दिली. त्यामुळेच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था जिवंत आहे. देशामध्ये स्थैर्य आणि अस्थैर्य कसे होते, याचे उदाहरण देत सुनील तटकरे यांनी यावेळी राजकारणाचा संपूर्ण इतिहासच जनतेसमोर मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हुंकार महाडच्या नगरीमधून दिला. तिथे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम होतेय, असेही तटकरे म्हणाले. आपले उमेदवार किती लाख मतांनी विजयी होणार आहे, हेच चित्र स्पष्ट व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना जशी सलामी दिली जाते तशी सलामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही चवदार तळ्यावरील पुतळ्यासमोर देण्यास सुरुवात केली असल्याचे सांगतानाच इतकी वर्षे अनंत गीते का असे काम करू शकले नाही? अनंत गीते तुम्ही कुठे होतात, असा संतप्त सवाल भरत गोगावले यांनी केला. तटकरेंना देशाच्या हितासाठी निवडून द्यायचे आहे. या रायगडचा मावळा केंद्रात गेला पाहिजे, असेही गोगावले म्हणाले.

Lok Sabha Election : विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे भवितव्य काय ?

तुतारी गट संपवण्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड तर मशाल गटाला संपवण्याचा विडा संजय राऊत यांनी घेतला आहे. राऊत आणि आव्हाड हे दोघे जण पक्ष संपवणार आहेत, अशी जोरदार टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. अदिती तटकरे यांनी चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी आणले. वडिलांनी मार्गदर्शन केले असले तरी अदिती स्वकर्तृत्वाने पुढे आल्या आहेत. तटकरे यांनी सर्व पदे कुटुंबातच दिली, अशी टिका करणाऱ्या  विरोधकांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन आमदार मिटकरी यांनी केले. 

सोमवारी दुपारी पेण येथील आंबिवली येथे सभा झाल्यानंतर वढाव येथे दुसरी सभा पार पडली. त्यानंतर गाठीभेटी घेत आणि जनतेशी संवाद साधत सुनील तटकरे यांची महाड शहरात रात्री जाहीर प्रचार सभा पार पडली. महाड शहरातील जाहीर प्रचार सभेला पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, मनसेचे नेते वैभव खेडेकर, विकास गोगावले, प्रफुल्ल खेडेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!