Bhandara Gondia Constituency : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (महायुती) यंदा 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणायचा ध्यास घेतला आहे. तर काँग्रेसने (महाआघाडी) सत्ता परत एकदा काबीज करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. अशात दोन्ही गटांना आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी 8 स्टार प्रचारक आले होते.या स्टार प्रचारकांनी भंडारा गोंदिया मतदार संघात राजकीय वातावरण तापविले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली व तेव्हापासून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक घेतली जात आहे. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात मतदान झाले.
आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच दिग्गजांचे मतदारसंघात आगमन झाले होते. या दौऱ्यात त्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभांना मार्गदर्शन केले. यंदा सर्वाधिक सभा महायुतीतील भाजपकडून घेण्यात आल्या. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व रिपाइं महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री भाजपचे अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
Bjp Mp No More : भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचे निधन
तर दुसरीकडे कडे काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आदींच्या महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राहुल गांधी, महासचिव मुकुल वासनिक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उद्धवसेनेच्या सुषमा अंधारे आल्या होत्या. लोकसभा मतदारसंघात महायुती व महाआघाडीशिवाय बहुजन समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते.
या सर्व रणधुमाळीत आता 4 जूनला येणाऱ्या निकालाची वाट भंडारा गोंदिया लोकसभेचे मतदारसंघातील मतदारांसह नेते आणि त्यांचे स्टार प्रचारक पाहत आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणता स्टार प्रचारक फलला आणि कोण मारत ठरला याचा गणित मात्र आतापासूनच लावले जात आहे.