महाराष्ट्र

Lok Sabha Election : उमेदवार श्‍यामकुमार बर्वे, पण लढाई सुनील केदारांची !

Ramtek Constituency : श्‍यामकुमार बर्वे यांनी जोरदार टक्कर, उमेदवार जरी बर्वे असले तरी ही लढाई सुनील केदारांची

Lok Sabha Election : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार ठरवण्याच्या वेळी कधी नव्हे त्या नाट्यमय घडामोडी झाल्या. शिवसेनेला दोन वेळेला गड जिंकून देणाऱ्या कृपाल तुमानेंना ऐन वेळी उमेदवारी नाकारून काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना देण्यात आली. पारवेंची गॅरंटी स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. त्यांना काँग्रेसचे उमेदवार श्‍यामकुमार बर्वे यांनी जोरदार टक्कर दिली आहे. येथे उमेदवार जरी बर्वे असले तरी ही लढाई सुनील केदारांची होती.

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत केदारांना अतिशय सूक्ष्म नियोजन केले. अगदी बूथ स्तरापर्यंत त्यांनी तगडी यंत्रणा लावली होती. त्यामुळे येथे काट्याची टक्कर झाली आहे. रामटेकशिवाय भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गॅरंटी घेणारे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि अमरावतीची गॅरंटी घेणारे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नेत्यांच्या हमीनंतरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते, अशा माहिती आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने शेवटपर्यंत आग्रह धरला होता. मात्र शिंदे सेनेने मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यापूर्वी राजू पारवे यांना उमेदवारी देण्याचे भाजपने जवळपास निश्चित केले होते. सेना दबावाला बळी पडत नसल्याने उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार पारवे यांना सेनेत पाठवण्यात आले. त्यांच्या विजयाची खात्री स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. त्यामुळे सेनेला दोन वेळा रामटेक जिंकून देणारे खासदार कृपाल तुमाने यांना घरी बसवण्यात आले.

Lok Sabha Election : मेळघाटात रस्ता नाही, वीज नाही; मतदानही नाही

काँग्रेसने रामटेकमधून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवार केले असले तरी माजी मंत्री सुनील केदार यांनी येथे आपले सर्वस्व पणाला लावले आहे. येथील मतदारांचा कौल बघता भाजपची धाकधूक वाढली आहे. पारवे जिंकल्यास बावनकुळे यांच्या धाडसाचे कौतुक होईल. परंतु विपरीत निकाल आल्यास काय होईल, हे आत्ताच सांगता येणे अवघड आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांना बदलण्याचे भाजपने जवळपास निश्चित केले होते. माजी राज्यमंत्री परिणय फुके यांची उमेदवारी येथे पक्की मानली जात होती. फुके कामालाही लागले होते.

पहिल्या दोन याद्यांमध्ये मेंढे यांचे नाव नव्हते. त्यामुळे बदल परिणय फुके यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात भाजपची यादी जाहीर झाली तेव्हा सुनील मेंढे यांचे नाव झळकले. त्यामुळे भाजपतील अनेक नेत्यांना धक्का बसला. भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांचे वर्चस्व आहे. हे बघता त्यांची पसंती व हमी घेण्यात आल्याचे समजते. गडचिरोलीतून तीन वेळा निवडून आलेले खासदार अशोक नेते यांनाही बदलण्यात येणार होते. मात्र त्यांच्या विजयाची कोणीच हमी घेतली नसली तरी दुसरा सक्षम उमेदवार नसल्याने नेते यांनाच पसंती देण्यात आली.

फडणवीस यांच्याकडे अमरावती..

अमरावती लोकसभेकरिता आज (ता. 26) मतदान पार पडले. येथून भाजपने सर्वांचा विरोध झुगारून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. अमरावतीची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!