महाराष्ट्र

Lok Sabha Election : भाजपच्या काळात एकातरी मुस्लिमाला पाकिस्तानात जावे लागले का? 

Raosaheb Danve : विरोधकांच्या अपप्रचाराला दानवे यांचे सडेतोड उत्तर

BJP News : भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तर मुस्लिमांना पाकिस्तानात जावं लागेल असा आरोप व्हायचा पण सांगा एकतरी मुस्लिम तिकडे गेला का, मग आम्ही जातियवादी कसे असा सवाल त्यांनी केला.

“ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, फारूक अब्दुल्ला आम्ही जातीयवादी आहोत असा उल्लेख करतात. मग आम्ही जातीयवादी आहोत तर, मग आमच्या पंगतीत बसून जेवले आणि खरकटे तोंड घेऊन कुणीकडे गेले ? अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. सोमवारी ते बुलढाणा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ धाड येथे झालेल्या सभेत बोलत होते. त्यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.

मतदान प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षातील बड्या नेत्यांकडून विरोधकांवर भाषणातून हल्ला चढवला जात आहे. रावसाहेब दानवे यांनीही विरोधकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, मी आणि शरद पवार पुलोदमध्ये एकत्र निवडणूक लढवली,फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा अटलजींच्या सरकारमध्ये मंत्री मंडळात होते, मायावती दोनदा भाजपमुळे मुख्यमंत्री झाल्या,ममता बॅनर्जी अटलजींसोबत रेल्वे मंत्री होत्या, नितीशकुमार भाजपच्या भरवशावर मुख्यमंत्री होते.

Lok Sabha Election : थकलेल्या प्रचारकांनी काँग्रेसला जिंकता येईल का? 

हे जे आम्हाला जातीयवादी म्हणत आहेत ना, जेव्हा आमची मते तुम्ही घेता तेव्हा आम्ही जातीयवादी नाही. मात्र, जेव्हा तुमची मते आम्हाला लागतात तेव्हा आम्ही जातीयवादी कसे. अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. “या देशाचे पंतप्रधान 2024 मध्ये नरेंद्र मोदी होणार आहेत”, असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

मोदींनी गोरगरीब जनतेच्या हिताच्या योजना देशभर राबविल्या. त्याचा थेट फायदा जनतेला होत असल्याने देशातील जनता मोदींजीवर प्रेम करते. त्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे. मोदी सरकार गरीबांच सरकार आहे. आता मोदी सरकार सत्तेवर येईल असा विश्वास यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेवटी व्यक्त केला. प्रचार सभेला रावसाहेब दानवें सोबत अभिनेता गोविंदा उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!