महाराष्ट्र

Lok Sabha Election : काँग्रेसचा घोटाळा सर्वव्यापी

Buldhana Constituency :  आकाश, भूगर्भ, पाणीही सोडले नाही

Buldhana Constituency : काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराने एवढी पातळी गाठली होती की आकाश, भूगर्भ आणि पाणीही सोडले नाही. आणि “मोदीजी म्हणत आहेत की भ्रष्टाचार संपवू आणि एकाही भ्रष्टाचा-याला सोडले जाणार नाही. ते सर्व तुरुंगात जातील.यावरून भाजपची भूमिका स्पष्ट होते असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. 

रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे महायुतीच्या उमेदवारांच्या निवडणूक सभेला संबोधित करताना नड्डा यांनी इंडिया गठबंधनावर हल्ला चढवला.

मोदींचा हवाला देत ते म्हणाले, काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वव्यापी होता. कोणतेच क्षेत्र त्यांनी सोडले नाही. विरोधकांविषयी ते म्हणाले, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लॅपटॉप घोटाळा, गोमती (नदी) घोटाळा आणि अन्नधान्य घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. राजद नेते लालू प्रसाद यांचा चारा घोटाळा सर्वांना माहित आहे.

द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्यावर हल्लाबोल करत नड्डा म्हणाले, “स्टालिन यांचे उत्पन्न १.३२ लाख कोटी रुपये आहे हे तुम्हाला माहीत आहे का. या उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळा केला नाही का? ही अहंकारी युती म्हणजे भ्रष्ट लोकांची युती आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी, पी. चिदंबरम, द्रमुकचे मंत्री आणि ममता बॅनर्जींचे मंत्री, आपचे केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन, टीएमसी मंत्री, केसीआरच्या कन्या के. कविता, सपा नेते आझम खान तुरुंगात आहेत की नाही ? इंडिया गटबंधनातील बहुतांश नेते एकतर जामिनावर आहे किंवा तुरुंगात आहे. असे म्हणत विरोधकांवर विश्वास ठेवणार का हा प्रश्न विचारला.

Lok Sabha Election : शेवटच्या ‘ओव्हर’मध्ये यवतमाळात एकनाथ शिंदे यांचा ‘पावरप्ले’

काँग्रेस मध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी; नॅशनल कॉन्फरन्समध्ये ओमर आणि फारूख अब्दुल्ला, मुलायमसिंह यादव यांच्यानंतर अखिलेश यादव आणि डिंपल यादव, लालू यादव-राबडीदेवी, तेजस्वी यादव-तेज प्रताप, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, करुणानिधी-एमके स्टॅलिन, उधयनिधी, उद्धव ठाकरे, आदित्य, शरद पवार, सुप्रिया सुळे या सर्वांना आपले कुटुंब वाचवायचे आहे आणि भ्रष्टाचारात गुंतायचे आहे,” असे नड्डा म्हणाले.

2024 ची निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आहे. यासाठी माहायुतीचे उम्मेदवार प्रतापराव जाधव यांना निवडणून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार डॉ.संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, खासदार रक्षा खडसे, नरहरी गवई उपस्थिती होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!