महाराष्ट्र

Lok Sabha Election : म्हणून मोदी, योगी यांच्या सभा रद्द

Akola Constituency : आमदार नितीन देशमुखांनी केला 'हा' दावा!  

Akola constituency : अकोला लोकसभेची जागा भाजपनं ‘ड गटा’त म्हणजेच ‘डेंजर झोन’मध्ये गेली असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत स्पष्ट झाल्याचा आमदार नितीन देशमुख यांनी दावा केला आहे. म्हणूनच योगी आदित्यनाथ अणि नरेंद्र मोदींच्या अकोल्यातल्या सभा रद्द झाल्या असल्याचे देशमुख म्हणाले. 

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहेत. अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभा रद्द झाल्याची माहिती आहे.

दरम्यान आता यावरही शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा रद्द होण्याचं कारण सांगत दावा केला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे आज खासदार मुकुल वासनिक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नितीन देशमुख हे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर आरोप केले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. तिहेरी लढत होत असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात तीनही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी भाषणात बोलताना, अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव होत असल्याने अकोल्यात होणारी योगी अणि मोदींच्या सभा रद्द झाल्या.

अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात महाविकास आघाडीची सभा आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस महासचिव खासदार मुकुल वासनिक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकरीही उपस्थित आहेत. या दरम्यान ते बोलत होते.

सभेची तयारी मधेच थांबली

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेची तयारी सुरु झाली होती. सभा मंडप तयार करण्यात येत होता. परंतु सभा रद्द झाल्याने तयारी मधेच थांबली. आता 24 एप्रिलला अकोला येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार असे कळते. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांना नव्याने कामाला लागावे लागेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!