Buldhana constituency : शेतकरी नेते तथा लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रविकांत तुपकर यांच्या पाठीशी शेतकरी चळवळीची सर्व ताकद अंतर्गत हेवेदावे विसरून उभी राहिली. आणि आता स्वाभिमानी दलित युवक व बहुजन समाजाची ऑल इंडिया पॅथर सेना संघटनेने देखील तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी तुपकर यांनाच विजयी करण्याचे आवाहन दलित-बहुजन समाजाला केलेले आहे.
याबाबत पाठिंब्याचे पत्र केदार यांनी तुपकरांना दिले. रविकांत तुपकरांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन दीपक केदार यांनी दलित-बहुजन समाजासह कार्यकर्ते व पदाधिकार्यांना केले आहे.
यापूर्वी शिंदे सेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मेहकर तालुक्यातील साबरा येथील ग्रामपंचायतीच्या दलित समाजातील सदस्याला अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तेव्हा दीपकभाई केदार यांनी साबरा गावात जाऊन दलित बांधवांना धीर देत, पीडित असलेले साबरा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन वानखेडे यांना आधार व संरक्षण दिले होते. तसेच, आ. रायमुलकर यांना जाहीर भाषणातून इशारा दिला होता. केदार हे आक्रमक नेते असून, दलित बांधवांत व खास करून तरूणवर्गात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांच्या पाठिंब्याने तुपकर यांच्या लढ्याला आता हजार हत्तीचे बळ प्राप्त झालेले आहे.
यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रविकांत तुपकर हे आपले सहकारी असून, त्यांच्या प्रचारासाठी ‘स्वाभिमानी’चे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील सहकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आदेश राजू शेट्टी यांनी दिले आहेत. त्यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र देखील दिले आह