महाराष्ट्र

Lok Sabha Election : अर्धा तास रांगेत उभे राहात मतदान केल्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले..

Chandrapur Constituency : पाचही जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास

Polling News : रखरखते ऊन..मतदान केंद्रावर सुरू असलेली लगबग आणि नागरिकांची मतदानासाठी लागलेली रांग. अशात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातील मतदान केंद्रावर पोहोचतात. कोणतही बडेजाव न करता ते संपूर्ण कुटुंबासह रांगेत लागतात. मतदान कक्षात आल्यावर तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांजवळ जात नम्रपणे त्यांना आपल्याजवळील ओळखीचा पुरावा दाखवतात व मतदान केल्यानंतर लगेचच बाहेर पडतात. 

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. 19) मतदान पार पडले. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दुपारी रांगेमध्ये लागून सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई, मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार-बिडवई उपस्थित होते. ज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. त्यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, व भंडारा-गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात एकूण पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा शुक्रवारी पहिला टप्पा होता. मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Lok Sabha Election : कोणी कुठे केले मतदान जाणून घेतले का?

विदर्भातील प्रतिष्ठित लढतीपैकी एक असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मतदान केले. विदर्भात मतदान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा मोठा विकास झाला आहे. विकासाच्या बळावर जनता भाजप, महायुतीसोबत आहे. निवडणुकीत भाजप ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्‍याने विजयी होईल. नरेंद्र मोदीच पुन्हा प्रधानमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्‍त केली.

लोकशाहीसाठी मतदान करा

मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे आपला अधिकार आहे. मतदानाचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. आपण सहकुटुंब मतदान केले आहे. जनतेला आवाहन आहे की, आपण सर्वांनी मतदान करावे. सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. मतदानाचे प्रमाण हे जास्तीत जास्त असायला हवे. लोकसभा निवडणूक ही परीक्षा आहे. यामध्ये नक्कीच आम्ही उत्तीर्ण होऊ. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर भाजप महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!