महाराष्ट्र

Lok Sabha Election : बळवंत वानखडेंचा स्टॅम्प पेपरवरील शपथनामा चर्चेत

Congress News : पुन्हा एकदा जिंकला जनतेचा विश्वास

Congress News : लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी प्रामाणिकतेचा परिचय देण्यासाठी शक्कल शोधली. जनतेची कोणकोणती कामे आपण करणार आहोत याचा शपथनामा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून जनतेसमोर ठेवला. त्याची मतदारसंघात चर्चा होत आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवून शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते, संत्राफळांच्या प्रक्रिया केंद्र निमिर्तीसाठी पुढाकार घेऊन 50 हजार लोकांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असेल, जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये 70 टक्के स्थानिकांना रोजगार मिळवून देणार,प्रत्येक तालुक्यात डिजिटल लायब्ररी उभारणार, महिलांना शहरात मोफत बस सेवा तसेच प्रत्येक तालुक्यात फिरते आरोग्य केंद्र उभारण्यात येणार, मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर होणारे अनधिकृत अतिक्रम रोखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळवून देणार असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.

Lok Sabha Election : अमरावतीत संजय राऊत विरोधात निदर्शने

अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी 37 उमेदवार रिंगणात उभे आहेत.अनेकांनी मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आश्वासनांची खैरात वाटत आहे. परंतु बळवंत वानखडे यांनी आश्वासनांचे आमिष न दाखवता लेखी शपथनामाच लिहून दिला आहे.जी कामे करणार आहेत ती चक्क स्टॅम्पपेपर वर लिहून जनतेसमोर सादर करण्याचे धाडस बळवंत वानखडे यांनी दाखविल्यामुळे त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काट्याची टक्कर होईल असे वाटत होते. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!