Shiv Sena : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस समर्थित महाविकास आघाडीने आपल्या विचारधारेच्या प्रवाह विरोधात डाव टाकला आहे. बाबरी मशिद पाडण्यासाठी कारसेवक म्हणून पार्श्वभूमी असलेले प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या गळ्यात महाविकास आघाडीने उमेदवारीची माळ टाकली. यावरूनच आता काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्या जात आहे. खेडेकर यांची नाळ शिवसेनेशी जुळली असल्याने हा मुद्दा आता लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.
खुद्द खेडेकरांनी काही दिवसांपूर्वी भर सभेत आपण कारसेवेत गेलो होतो. आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. मुस्लिम मतदार या व्हिडीओमुळे प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी विरोधकांनी केलेला प्रयोग यशस्वी होत असताना दिसून येत आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघात निवडणुकीतील राजकीय लढत जवळपास निश्चित होऊ लागली आहे. या मतदारसंघात नेहमीसाठी पंजा किंवा घड्याळ, धनुष्यबाण यामध्येच लढत होत होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र पंजा आणि घड्याळही गायब आहे.
बुलढाण्यात मुस्लिम मतांचा कल पंजा व घड्याळ चिन्ह गायबअसल्याने बदलणार आहे. त्यांच्यात गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. कारण या मतदारसंघात प्रमुख पक्षांचा विचार केला तर महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत दिले तरी ते शिवसेनेलाच जाणार आहे. हेच अनेक मुस्लीम मतदारांचे म्हणणे आहे.
तुंबळ लढत
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व इतर पक्ष अशी महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अशा महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही असे चित्र आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर तर महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव आहेत. हे दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या महायुती, आघाडीचे असले तरी ते शिवसेनेचेच आहेत.
काँग्रेस समर्थित महाविकास आघाडीने आपल्या विचारधारेच्या प्रवाह विरोधात डाव टाकला आहे. बाबरी मशिद पाडण्यासाठी कारसेवक म्हणून गेल्याची पार्श्वभूमी असलेले प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या गळ्यात महाविकास आघाडीने उमेदवारीची माळ टाकली. यावरूनच आता काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्या जात आहे. खुद्द खेडेकरांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या बुलढाण्यातील भर सभेत आपण कारसेवेत गेलो होतो, आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा केला होता. त्यांच्या भाषणातील त्या अंशाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार या व्हिडीओमुळे प्रभावित होत आहेत.
काय म्हणाले खेडेकर?
मी स्वतः 24 वर्षांचा होतो. त्यावेळेस कार सेवेला गेलो. ज्यावेळेस प्रथम कोठारी बंधू शहीद झाले होते. 30 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरच्या कार्यक्रमांमध्ये मी होतो. 2 नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो. माझ्यासमोर एक जण शहीद झाला. तो कुठला आहे म्हणून त्याच्या खिशातून कागद मी काढला.त्यावर लिहिलेले होते राम शरण गुप्ता ग्राम सुजागंज पोस्ट सातेल बिहार. त्यानंतर हनुमान गढीला लोक जमा झाले. शरद नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले. आम्ही सुद्धा रक्त सांडले, म्हणून उद्धवजी सांगतात आमचे हिंदुत्व लबाड नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे.
मतांचे विभाजन मुद्दा
सगळ्याच विरोधी पक्षांच्या दृष्टीने विरोधी मतांचे विभाजन हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे या नव्या घडामोडींचा आघाडीच्या गणितावर काय परिणाम होणार, हा प्रश्न सगळे जण विचारू लागलेले आहेत. आपण कारसेवेत गेलो होतो. आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा उमदेवार खेडेकरांनी खुद्द केल्याने मुस्लिम
अपक्ष उमेदवार यांनाच मतदान करण्याचा कल सध्या तरी अनेक मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मतदारांचा दिसून येत आहे. यामध्ये अपक्ष उमेदवारांपैकी संदीप शेळके व रविकांत तुपकर यांच्या नावाची चांगली चर्चा आहे. संदीप शेळके यांना अनेक मुस्लिम मतदारांनी पसंती दर्शविली आहे. दुसरीकडे रविकांत तुपकर यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे. एकंदरीत मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये खेडेकरांच्या त्या व्हिडीओमुळे प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांना साथ देण्याबाबत बोलल्या जाऊ लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या वादात मतदार संघात अपक्षाच्या पारड्यात अनेक मुस्लीम मते पडणार एव्हडे मात्र निश्चित.