Akola police : दुपारची भर उन्हाची वेळ. एक मानसिक स्वास्थ्य बिघडलेली महिला अनवाणी पायाने रस्त्याने फिरत होती. तिला वेडसर म्हणून लोक तिची हेळसांड करत होते. ती सैरावैरा पळत होती. तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. किंवा अघटीतही घडले असते. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशीच घटना दहीहंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या महिलेला पोलिसांनी घरी सुखरूप सोडताच तिचे आनंदाश्रू गगनात मावत नव्हते.
याबाबत हकीकत अशी की, एक मानसिक स्वास्थ्य केंद्र बिघडलेली महिला रस्त्याने फिरत आहे अशी माहिती चालक प्रवीण पेठे यांना करतवाडी रेल्वे निवासी मनोज रायबोले यांनी दिली. पोलिस पेठे यांनी रायबोले यांना सांगितले की “त्या महिलेकडे लक्ष ठेवा आम्ही लवकरच पोहचत आहे.” या महिलेच्या जीवाला धोका होऊ नये किंवा तिच्यासोबत काही अघटीत घडू नये म्हणून याची तत्काळ दखल घेत प्रवीण पेठे यांनी ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांना माहिती दिली.
ठाणेदार ठाकरे यांनी याबाबत दामिनी पथकाला तत्काळ पाचारण करण्यास सांगितले. तसेच बीट जमादार अघडते आणि शिरसाट यांनाही ठाणेदार ठाकरे यांनी याबाबत तत्काळ दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर दामिनी पथक आणि पोलीस कर्मचारी व चालक प्रवीण पेठे यांनी चोहोट्टाबाजार परिसरात असलेल्या या महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिला विश्वासात घेत तिची पोलीस विचारपूस करत होते. दरम्यान ही महिला पोलिसांना दगड मारण्याची भीती दाखवत होती. पोलिसांनी संयम ठेवत तिला अल्पोपहार देत तिची खातीरदारी केली. 10 तासानंतर या महिलेने तिच्या मूळ गावाची माहिती दिली. ही महिला अकोट तालुक्यातील अंबोडा झिंगवाडी येथील असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिस नायक चालक प्रवीण पेठे, हवालदार अघडते, शिरसाट, दामिनी पथकातील महीला कर्मचारी ऋतुजा जाधव या सर्व टीमने ठाणेदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनात महिलेला तिच्या घरी सुखरूप पोहचविले.
Lok Sabha Election : अकोला मतदारसंघातील पहिले ‘व्होट फ्रॉम होम’
या संपूर्ण घटनेची दखल घेत पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.
पोलिसांचे मनोबल वाढीसाठी बळ मिळेल : एसपी
या पुरस्कारामुळे पोलिसांना अधिक चांगले काम करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नक्कीच बळ मिळेल अशी आशा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी व्यक्त केली.