BJP Politics : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा सुधीर मुनगंटीवार यांनी चेहरामोहरा बदलला आहे. त्यांनी राज्य आणि देश पातळीवर आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राजकारणात ते विकासाला जास्त महत्त्व देत असल्याने त्यांची ओळख ‘विकास पुरुष’ म्हणून केली जाते. आता ते लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात आहेत. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हेच एकमेव पर्याय आहेत. त्यामुळे विकासाची डरकाळी फोडण्यासाठी चंद्रपूरचा वाघ लोकसभेत पाठवा, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ गडचांदुर येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. मंचावर सपना मुनगंटीवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, संजय धोटे, विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे, राष्ट्रवादीचे शरद जोशी, शिवसेनेचे विक्की राठोड, रिपाइंचे प्रभाकर खाडे, मनसेचे राजेश खटोड, रऊफ शेख, भाजपा नेते खुशाल बोंडे, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, सतीश उपलेंचवार, संदीप शेरकी, डॉ. मंगेश गुलवाडे, हितेश चव्हाण, विजयालक्ष्मी डोहे, रजनी मडावी, संगिता आत्राम, रामसेवक मोरे, अरविंद डोहे, नीलेश ताजने, महादेव ऐकरे, महादेव जैस्वाल, विना मुद्दलवार, शकुंतला कोसले, अपर्णा उपलेंचवार, मोना कलोडे, सुंदर दाठे, आनंदी मोरे, अॅड. दीपाली मंथनवार, शक्तीला शेख, परिकाही, सिंगरु, खंडाळे, सुषमा आवंढे, अर्चना आंबेकर, पायल येलमुले, नम्रता विश्वास उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या की, सुधीर मुनगंटीवार राजकारणातील सज्जन व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. दारूमुळे आमच्या शेकडों मायबहिणींचे संसार रस्त्यावर आलेत. त्याला प्रतिस्पर्धी उमेदवार जबाबदार आहेत. दारू विकत जिल्ह्याचा विकास होणार नाही. महिलांचे कुटुंब देशोधडीला लागतील. त्यामुळे तुम्हाला विकास हवा की विनाश हे ठरविण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार निवडून देत आपल्या जिल्ह्याचा विकास घडू द्या. विनाशाकडे वाटचाल करू नका
Lok Sabha Election : ..असे बेछूट आरोप करत सुटाल, तर लोक तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत !
सभेला संबोधित करताना मुनगंटीवार म्हणाले की, आज मी गडचांदुर येथे असताना रस्त्यात खड्डेच खड्डे दिसले. या भागाचा दौरा करीत असताना अनेक गावकऱ्यांनी भेट घेऊन रस्त्याचे काम, पुलाचे काम करण्याची मागणी केली. निवडणुकीत तुम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार-खासदार निवडून देता. पुढील पाच वर्षे ते फिरकतही नाहीत. जनतेचे एकही काम करीत नाहीत. विकास तर दूरच राहिला. जर तुम्हाला तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा. मी विकासाची गंगा गावात घेऊन येईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.