महाराष्ट्र

Lok Sabha Election : मी तीनशे विकासकामे केली, त्यांनी एकवीस तरी दाखवावी !

Chandrapur Constituency : सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधकांना आव्हान

BJP News : अगदी धृतराष्ट्र देखील सांगू शकतील एवढी विकासाची कामे चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात केली आहेत. मी फक्त विकासाचे राजकारण करतो, जातीपातीचे, घाणेरडे राजकारण उभ्या आयुष्यात कधी केले नाही. तीनशेच्या वर विकासकामे केली आहेत. त्याची यादी तुमच्यासमोर वाचून दाखवितो. पण विरोधकांनी त्यांच्या काळात 21 कामे केली आहेत का? हे जनतेला त्यांनी सांगावे, असे आव्हान महायुतीचे चंद्रपूर मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते बोलत होते. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट) व मित्रपक्षाची शक्ती आपल्या सोबत आहे. महायुतीला प्रचंड जनसमर्थन लाभत असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात जनतेसमोर आपण केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सादर करीत आहोत. परंतु विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मागील पाच वर्षात राजुरा विधानसभा मतदारसंघाचा विकास रखडला आहे. नागरिकांना जाण्या-येण्यासाठी साधे रस्ते करता आले नाहीत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

प्रश्न मार्गी लावणार

ज्या भागात पाणी पुरवठा, वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल तो तातडीने सोडविण्यासाठी लोकसभेत निवडून आल्यानंतर तातडीने मार्गी लावू अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. त्यासाठी मला आशीर्वादरूपी मत द्यावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. सास्ती, तोहगाव, लाठी, धाबा, गोवरी, चुनाळा, विरूर, चकदरूर, भंगाराम तळोधी, विठ्ठलवाडा, वढोली, खरारपेठ आदी ठिकाणी प्रचार यात्रा घेतल्या. माथरा, रामपूर, विहिरगाव, मूर्ती, नलफडी, सिंधी, धानोरा, धानापूर, करंजी, आक्सापुर, सरांडी, सोनापूर देशपांडे, सकमुर, दरुर, चकपारगाव, खराळपेठ आदी गावातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मतदारसंघात महायुतीसाठी उत्तम वातावरण आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

भाजपची पूर्ण टीम कामालस

भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बंडू हजारे,सुरेश धोटे, सुरेश रागीट, मधुकर नरड, सुनील उरकुडे, सुभाष बोनगिरवार, सचिन शेंडे,अरुण लोखंडे, सरपंच सुचिता मावलीकर, प्रतीक चन्ने, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वडपल्लीवार, गणेश पिसे, महेंद्र बोबडे, प्रवीण मुनगंटीवार, विपुल भडी, गजानन झाडे, भारत कुळसंगे, बंडू धोटे, सुरेश वांढरे, सुनीता उरकुडे, प्रकाश फुटाणे, स्नेहा दरेकर, मीरा वांढरे, सरपंच बाळू वडस्कर, सिद्धार्थ पथोडे, अरुण मस्की, विलास बोनगीरवार, संजय पावडे, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, बबन निकोडे,अमर बोडलावार, दीपक सातपुते, निलेश पुलगमकार, स्वप्नील अनमुलवार, राजेंद्र गोहणे, हिरा कंदिगुरवार,निळकंठ लखमापुरे, रुपेश लिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीचा सर्वांगीण विकासाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवित आहेत असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

PM Modi in Chandrapur : हे दारूच्या धंद्यातून कमावलेल्या पैशांतून भरलेले डिपॉझीट नाही, मुनगंटीवार कडाडले !

राजुऱ्याचे प्रश्न सुटणार : धोटे

राजुरा विधानसभा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे. या मतदारसंघात विकास कामे झालेली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद फक्त सुधीर मुनगंटीवार यांच्यातच आहे. आपण सर्वांनी झोकून देऊन सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत लाखो मतांनी विजयी करून त्यांना संसदेत पाठविले तरच केंद्रातील निधी आपल्या जिल्ह्याला आणि विधानसभा मतदार संघाला मिळेल. आपल्या क्षेत्राचा विकास होईल, अशी भावना माजी आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केली.

विकासासाठी एकच पर्याय निमकर

आजवर आम्ही अनेक नेते बघितलेत. शब्द देतात आणि वेळ आली की विसरून जातात. पण मुनगंटीवार इथे अपवाद ठरतात. आम्ही जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे विषय ठेवला तेव्हा-तेव्हा त्यांनी दिलेला शब्द पाळला. त्यामुळे सर्व प्रश्न आणि अडचणी मार्गी लावल्या आहेत. त्यांच्याकडे समस्या गेली की त्यावर शंभर टक्के इलाज असतो. असा एकही प्रश्न नसेल की जो सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविला नसेल. त्यामुळे लोकसभेत आपल्या हक्काचा उमेदवार निवडून पाठविणे गरचेचे आहे, असे माजी आमदार सुदर्शन निमकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!