महाराष्ट्र

Lok Sabha Election : मोदींच्या विकासाच्या व्हिजनला राज ठाकरे यांचा पाठिंबा

Eknath Shinde : त्यांची कुठलीही अट नाही, त्यांचे स्वागत करतो

Nagpur constituency : पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचे स्वागत करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच त्यांनी कुठलीही अट ठेवलेली नाही असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकी संदर्भात

विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सोबत राहील का असे विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण आधी लोकसभा तर होऊ द्या. मग विधानसभेचा विचार करू.

त्यांची उठाबशा सेना, आमची बाळासाहेबांची

त्यांची उठाबसा सेना? असल्याची उबाठा सेनेवर त्यांनी टीका केली. तर, आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी, सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले. धनुष्यबाण गहाण ठेवला आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली.

मोदींवर आरोप करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही

मोदींवर आरोप करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही. तसेच मोदींना भेकड म्हणणं योग्य नाही. कोरोनाच्या काळात ते घरी बसले होते आणि मोदींनी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना मदत केली. तेव्हा आरोप लावणारे घरी बसून कोणता शौर्य दाखवत होते. जेव्हा कोरोनामध्ये लोक मरत होते. तेव्हा हे घरी बसून रोकड मोजत होते. त्यांना रोकड पक्षाचे अध्यक्ष म्हणावं का, रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये अशा शब्दांत शिंदे यांनी कान उघाडणी केली.

महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधानांचे योगदान

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात अनेक सभा दिल्या आहेत. त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आणि

महायुतीच्या जागावाटप लवकरात लवकर जाहीर होईल असे सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!