महाराष्ट्र

Lok Sabha Election : बुलढाणा जिल्ह्यात जोडावे लागणार अतिरिक्त बॅलेट युनिट !

Buldhana constituency : निवडणूक विभागाची वाढणार डोकेदुखी!

Lok Sabha Election 2024 : विदर्भातील दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामात 21 उमेदवार रिंगणात राहिल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे आता एका ऐवजी 2 बॅलेट युनिटचा वापर करावा लागेल. यामुळे मतदारच नव्हे तर निवडणूक विभागाची देखील डोकेदुखी वाढली आहे. अतिरिक्त युनिट विधानसभा स्तरावर मशीनला जोडून घ्यावे लागणार असून ही कार्यवाही याच आठवड्यात करावी लागणार असल्याची माहिती आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तब्बल 21 उमेदवार शिल्लक राहिल्याने निवडणूक यंत्रणांसाठी उमेदवारांची महा संख्या ही डोकेदुखी ठरली आहे. याचे कारण देखील मोठेच आहे. ईव्हीएमला बॅलेट युनिट व कॅट्रोल युनिट जोडलेले असतात. बॅलेट युनिटवर मतदार मतदान करतात. या मतदान संचाची क्षमता ‘नोटा’ सह 16 इतकी असते. वरील 15 ठिकाणी उमेदवारांचा तपशील आणि सर्वात शेवटी ‘नोटा’ ( वरील पैकी कोणीही नाही) चे बटन राहते. रिंगणातील कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ते बटन दाबून नकारार्थी मतदान करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, बॅलेट युनिटची क्षमता नोटासह 16 इतकीच आहे. बुलढाण्यातील संग्रामात त्यापेक्षा जास्त म्हणजे 21 उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ईव्हीएमला आणखी एक बॅलेट युनिट जोडावे लागणार आहे.

दरम्यान जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात मशीन, दोन्ही युनिट्स, व्हीव्हीपॅट मिळाले आहे. आयोग 15 पेक्षा जास्त उमेदवारांची शक्यता गृहीत धरून युनिट्स पाठवितो. यामुळे बॅलेट युनिट्स आणण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. मात्र मागील सरमिसळ मध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान साहित्य पाठविण्यात आले आहे. आता जादाच्या बॅलेट युनिट्स पाठवाव्या लागतील. हे अतिरिक्त युनिट विधानसभा स्तरावर मशीनला जोडून घ्यावे लागणार आहे. ही कार्यवाही याच आठवड्यात करावी लागणार आहे.

Lok Sabha Election : 21 उमेदवार आजमावणार भाग्य !

उमेदवार जास्त झाल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेणे शक्य आहे का?

मतदान बॅलेट पेपरवर शिफ्ट होऊ शकतं का? तर… निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एका मशीनवर NOTA सह फक्त 16 उमेदवारांना समाविष्ट केलं जाऊ शकतं. असे 24 मशिन कंट्रोल युनिटने जोडून एक ईव्हीएमचा सेट तयार होतो. म्हणजे ईव्हीएमच्या एका सेटवर फक्त 384 उमेदवारांना समाविष्ट केलं जाऊ शकतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातल्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, तिथे 185 उमेदवार मैदानात होते. त्यामुळे अधिकचे ईव्हीएम युनिट जोडून मतदान घेणं शक्य झालं होतं. कारण, ईव्हीएमचा संच 384 उमेदवार समाविष्ट करून घेऊ शकतो. त्यामुळे असे युनिट जोडून निजामाबादमध्ये मतदान शक्य झालं होतं. पण, महाराष्ट्रात अगदी याउलट परिस्थिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!